Friday, May 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

राज्यात जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र उभारणार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 4, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र उभारणार
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्या वतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असे यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कौशल्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत फुंग यांनी समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे या बैठकीला उपस्थित होते.

लवकरच सामंजस्य करार
सिंगापूरच्या जागतिक कौशल्य केंद्राच्या माध्यमाने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना जगभरातील रोजगाराच्या संधीचे दरवाजे खुले होतात. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील युवकांना जागतिक स्तरावर संधी निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे. सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी

Next Post

कुशल, उपक्रमशील मनुष्यबळासाठी डीपेक्स उपयुक्त

Next Post
कुशल, उपक्रमशील मनुष्यबळासाठी डीपेक्स उपयुक्त

कुशल, उपक्रमशील मनुष्यबळासाठी डीपेक्स उपयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • तुर्कीला दणका, सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द
  • मोदी शहांना ठाकरे, पवार यांची कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत
  • स्मार्ट बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत
  • तिरुपती मंदिराच्या धर्तीवर शिर्डीत डोनेशन पाॅलिसी
  • अमळनेरजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.