तेच साधेपण.. तेच निर्मळ मनमोकळेपण!
मुंबई : महाराष्ट्रात आपल्या कर्तबगारीने लोकाभिमुख स्वच्छ आयपीएस अधिकारी म्हणून ख्याती असलेले आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या युवा पिढीचे “आयकॉन”असलेले मुंबईचे पोलिस उपमहानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांची संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने आणि कोल्हापूरचे डॅशिंग पत्रकार संतोष पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. विधू विनोद चोप्रा यांच्या “ट्वेल्वथ फेल” या सुपर हिट सिनेमाचे “रिअल हिरो “असलेल्या मनोजकुमार यांच्या बरोबर राजा माने व संतोष पाटील यांच्या गप्पा झाल्या. विविध विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. मनोजकुमार शर्मा यांनी यावेळी त्यांच्या कोल्हापुरातील जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून सेवाकार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.