१ जुलैपासून योजना लागू, दिवाळी, सुटीचा काळ वगळता सवलत
मुंबई : प्रतिनिधी
एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणा-या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ही सवलत १ जुलैपासूनच सुरू होत आहे.
१ जूनला एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकिट काढणा-या प्रवाशांसाठी लागू राहणार आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणा-या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, ल्लस्र४ु’्रू.े२१३ूङ्म१२.ूङ्मे या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा े२१३ू इ४२ फी२ी१५ं३्रङ्मल्ल या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५ टक्के सवलत मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने १५ टक्के भाडेवाढ केली होती. त्यात या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ज्यादा बससाठी
सवलत लागू नाही
राज्य सरकारने बसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांनी अॅडव्हान्स बुकिंग केल्यास १५ टक्के सूट देण्याची घोषणा केली असली तरी जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे ज्यादा बसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना या सवलतीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.