मुंबई : २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च २०२५) आकडेवारी प्रसिद्ध झाली असून गेल्या वित्तीय वर्षात महाराष्ट्राने १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये इतकी विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण विदेशी गुंतवणुकीच्या तब्बल ४० टक्के आहे. यावर्षी देशात आलेली एकूण विदेशी गुंतवणूक ही ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपये इतकी आहे. महाराष्ट्राने गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२ टक्के गुंतवणूक अधिक आकर्षित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या उद्योगस्नेही धोरणाना विदेशी गुंतवणूकदारानी दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद आहे. या विक्रमी गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महायुती सरकार आणि समस्त महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च २०२५) शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांतच पार झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मागील दशकातील परकीय गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांमध्ये) :
2015-16 : 61,482 कोटी
2016-17 : 1,31,980 कोटी
2017-18 : 86,244 कोटी
2018-19 : 57,139 कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 : 1,64,875 कोटी