“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे”
सोलापूर : प्रतिनिधी
राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापूरच्या कु. वैष्णवी राम गायकवाड ही मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरली आहे.
सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सोलापूरच्या वैष्णवी गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात पहिलं स्थान मिळवून संपूर्ण जिल्ह्याचा आणि समाजाचा अभिमान वाढवला आहे.
वैष्णवी ही नामवंत ऑर्चिड कॉलेजमधून इंजिनीअरिंग शिक्षण घेत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातून विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. अभ्यासात सातत्य, कष्ट, आणि स्वाभिमानी दृष्टिकोनामुळे तिने हा टप्पा पार केला.
तिचे वडील श्री. राम गायकवाड हे गेल्या तीन दशकांपासून ‘मराठा सेवा संघा’च्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आहेत. शिक्षक दांपत्याची ही कन्या आपल्या घरातील मूल्यांचं यथार्थ प्रतिबिंब आहे.
वैष्णवीचं हे यश म्हणजे केवळ शैक्षणिक भरारी नाही, तर सामाजिक वारशाला पुढे नेण्याचं व्रत आहे. आजच्या या यशाच्या पायावर भविष्यात ती एक संवेदनशील, दूरदृष्टी असलेली प्रशासन अधिकारी म्हणून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवेल, अशी आशा आणि अपेक्षा आहे.
वैष्णवी, तुझं यश हे आमचं गौरवगान आहे! अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा……!