Tuesday, August 5, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर निवर्तले

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 20, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर निवर्तले
0
SHARES
5
VIEWS


पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. मुलांमध्ये विज्ञान रुजावे, यासाठी त्यांची खास तळमळ होती. विज्ञान सुलभ भाषेतून शिकवण्यासाठी ते साहित्याच्या पंढरीत रमले.
जयंत नारळीकर यांना पूर्वीपासूनच अंतरिक्ष, अंतराळाची ओढ होती. खगोल विज्ञानात त्यांचा पूर्वीपासून ओढा होता. त्यातूनच त्यांनी आकाशाशी नाते जोडले. पण विज्ञानातील या घडामोडी बालगोपाळांपासून अबालवृद्धांपर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहचाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी लेखणीतून महाराष्ट्राला विज्ञान साक्षर करण्यासाठी लेखणी झिजवली. त्यांनी विज्ञान साहित्यविश्वाचे नवे दालनच उघडले नाही तर ते समृद्ध केले. पाश्चात्य देशातील लोकांमध्ये जसा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसा आपल्याकडील लोकांचा असावा, ही त्यांची प्रांजळ भावना होती.

१९७९ मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांचा यक्षांची देणगी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याने विज्ञान साहित्याच्या चौकटी बदलल्या. हॉयल-नारळीकर सिद्धांतामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. विज्ञान कथा लिहिताना त्यांनी बोजड, कंटाळवाणे वळण टाळले. उलट त्यात साहित्य विनोदाची पेरणी केली. त्यांच्या या पुस्तकांची मराठी तरुणाईलाच नाही तर आबालवृद्धांना भुरळ घातली. मराठी साहित्याला या विज्ञान कथांनी नवी उभारी आणि भरारीच दिली असे नाही तर महाराष्ट्राचा विज्ञानवादी दृष्टीकोन भक्कम होण्याचा पाया यामधून घातला गेला. घरातूनच त्यांना विज्ञानाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते तर आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले होते. तेथूनच त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली होती.

केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर जयंत नारळीकर भारतात परतले. आधी त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

Previous Post

जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला : मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी

Related Posts

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर
राष्ट्रीय

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
Next Post
छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी

छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.