Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त ठरला

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 22, 2025
in मनोरंजन, महाराष्ट्र
0
राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त ठरला
0
SHARES
8
VIEWS



मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांचा बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी पुढील वर्षी प्रदर्शित होत असून आज खुद्द अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. रितेश यांनी या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून काही दिवसांपूर्वीच त्यांचा शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवत विक्रम नोंदविला. त्यामुळे आता रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यातच आता चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्याने प्रतिक्षा संपली असून आता चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे.
अभिनेता म्हणून रितेश देशमुख यांचा चाहता वर्ग मोठा आहे तर महाराष्ट्रात मराठमोळा रितेशभाऊ, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा चिरंजीव म्हणूनदेखील रितेश देशमुख यांची वेगळी ओळख आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुख यांच्या प्रत्येक चित्रपटावर मराठी प्रेक्षक सातत्याने प्रेम करतो. तुझे मेरी कसम चित्रपटातून रितेश यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून रितेश यांची बॉलिवूडमध्ये हीट एंट्री झाली. त्यानंतर अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच लय भारी आणि वेड या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी सिनेरसिकांची मने जिंकली.


आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदुस्थानच महापराक्रमी राजे शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट घेऊन रितेश देशमुख चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. रितेश यांच्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. आता या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली. परंतु चित्रपट पाहण्यासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.


पुढील वर्षी महाराष्ट्रदिनाचा मुहूर्त
१ मे २०२६ रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ६ विविध भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने देशभरातील विविध राज्यातील चाहत्यांना त्यांच्या भाषेत सिनेमाची कथा आणि गौरवशाली इतिहास पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

Previous Post

पाकमधील सिंध प्रांतात पाणी पेटले

Next Post

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक

Next Post
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी ब्रेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.