Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा!

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 26, 2025
in state, मनोरंजन
0
दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा!
0
SHARES
9
VIEWS

२५ -२७ -२८ जुलैला होणार चित्रपट महोत्सव!

मुंबई : प्रतिनिधी
‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली होती. मराठी चित्रपट, कला संस्कृतीच्या माध्यमातून दर वर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो. गेल्यावर्षी प्रथम म्हणजे २०२४ च्या २७ आणि २८ जुलै रोजी हा सोहळा कॅलिफोर्नियामध्ये अमेरिका, कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या उपस्थितीत पहिला भव्यदिव्य महोत्सव संपन्न झाला होता. यावर्षी २५, २६ आणि २७ जुलै २०२५ ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅन होजे येथे संपन्न होणार असल्याची घोषणा नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबईत केली.

उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जवळपास साडेपाच लाख मराठी, भारतीयांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याची धडपड अभिजित घोलप ‘नाफा’च्या माध्यमातून करीत आहेत. दर महिन्याला १ मराठी चित्रपट ‘उत्तर अमेरिका-कॅनडा’मध्ये २०२४ पासून प्रदर्शित होत आहेत. गुलकंद, सुजित सुशीला, संगीत मानापमान, चिकीचीकी बुबुम्बुम, पाणी, गुलाबी, नवरा माझा नवसाचा २, अशी ही जमवा जमावी, स्थळ, सलतात रेशीम गाठी इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिकेत आणि कॅनडामध्ये नाफाद्वारे रितसर चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी तिथे प्रदर्शित झाले असून अमेरिकेत या सर्व चित्रपटांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत.

अमेरिकेत हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून अभिजित घोलप नाफाची कार्यप्रणाली विकसित करीत असून तेथील अनेक तरुण कलावंत, प्रेक्षक जोडले जात असल्याचे घोलप सांगतात. ते म्हणाले. देऊळ या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी, असा विचार मनात होता. माझ्या या विचाराशी सहमत असलेले ५०० हून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. वर्षाअखेरीस दोन लघुपटाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून फिल्म क्लबच्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून कार्यविस्तार होत आहे., विविध क्षेत्रात आघाडी घेतल्यानंतर अमेरिकेतल्या भारतीयांना मनोरंजन क्षेत्रात आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे.


गेल्यावर्षीच नाफाने या दिशेने पहिले पाऊल टाकले असून,अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटसृष्टी उभारणीचे स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या सर्व कलावंत आणि तंत्रज्ञाच्या साथीने लवकरच ते पूर्णत्वास जाईल. ‘नाफा २०२४’ महोत्सवामध्ये जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, सुबोध भावे, दिग्दर्शक जब्बार पटेल, उमेश कुलकर्णी, डॉ. सलील कुलकर्णी, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मेधा मांजरेकर इत्यादींची उपस्थिती लाभली होती.

यावर्षी नाफा फिल्म फेस्टिव्हल २५, २६, २७ जुलै २०२५ रोजी, कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. नाफा महोत्सवासाठी अमेरिकेतील बीएमएमच्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

Previous Post

मुंबईत तुफान पाऊस

Next Post

स्व. बापू, तुमच्यासारखा निर्मळ भाबडेपणा दुर्मिळ झालाय हो…

Related Posts

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
state

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

July 22, 2025
सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट
state

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 19, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?
state

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
मनी लॉंड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीनला धक्का
मनोरंजन

मनी लॉंड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीनला धक्का

July 4, 2025
३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग
state

३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

July 1, 2025
महाराष्ट्रातील १३८ थिएटरमध्ये “सजना” गाजतोय.. बार्शीकरांनो बुकिंग आजच करा…!
मनोरंजन

महाराष्ट्रातील १३८ थिएटरमध्ये “सजना” गाजतोय.. बार्शीकरांनो बुकिंग आजच करा…!

June 28, 2025
Next Post
स्व. बापू, तुमच्यासारखा निर्मळ भाबडेपणा दुर्मिळ झालाय हो…

स्व. बापू, तुमच्यासारखा निर्मळ भाबडेपणा दुर्मिळ झालाय हो...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.