Wednesday, July 9, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

गेवराईजवळ भीषण अपघात, ६ ठार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 27, 2025
in महाराष्ट्र
0
गेवराईजवळ भीषण अपघात, ६ ठार
0
SHARES
6
VIEWS


गेवराई : बीड जिल्ह्यात एका भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीचा पहिल्यांदा अपघात झाला, त्यातून ते बचावले आणि लगेच गाडीतून खाली उतरले. मात्र, काळाचा घाला त्यांच्यावर बसलाच. कारण जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या या प्रवाशांना ट्रकच्या रुपाने आलेल्या यमदूताने गाठले आणि ६ जणांचा जीव गेला. गेवराई शहरानजीकच्या गढी पुलावर सोमवार, दि. २६ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, ६ जण जागीच ठार झाले. या घटनेमुळे बीड हादरले असून मृतांच्या कुटुंबावर तर दु:खाचा अक्षरश: डोंगरच कोसळला.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. गेवराई शहराच्या जवळ असलेल्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहन डिव्हायडरवर धडकल्याने किरकोळ अपघात झाला होता. त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, कोणी जखमी झोले नाही. मात्र ती एसयूव्ही डिव्हायडरला धडकून तिथेच अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी गाडीत बसलेले सर्व बाहेर आले. मात्र ते रस्यावर उतरून उभे असताना त्याच महामार्गावरून जाणारा एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्याने उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले आणि चिरडले गेले.

हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकखाली चिरडल्या गेलेल्या सर्वांचाच मृत्यू झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृतांची नावे आहेत तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला. तसेच जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण बीड हादरले आहे.

Previous Post

ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

भारत-बांगलादेश सीमेवर वाढला तणाव

Related Posts

गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणा-या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

July 8, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक

July 8, 2025
मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा
महाराष्ट्र

मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा

July 8, 2025
विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन
महाराष्ट्र

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

July 8, 2025
राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!
महाराष्ट्र

राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!

July 8, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’

July 8, 2025
Next Post
भारत-बांगलादेश सीमेवर वाढला तणाव

भारत-बांगलादेश सीमेवर वाढला तणाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025
राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025
एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

एज्युकेशन लोन आता १५ दिवसांत मिळणार

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.