Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

मिठी नदी घोटाळा, डिनो मोरियाची चौकशी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 28, 2025
in महाराष्ट्र
0
मिठी नदी घोटाळा, डिनो मोरियाची चौकशी
0
SHARES
6
VIEWS

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून मिठी नदी घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यासाठी अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा चौकशीसाठी डिनो मोरिया आणि त्याच्या भावाला बोलवण्यात आले आहे. हे दोघेही चौकशीसाठी दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी त्याची चौकशी सुरु आहे.

डिनो मोरिया २६ मे २०२५ रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. डिनोची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. मिठी नदीतील साफसफाईच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात डिनोला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी केले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. सायंकाळी ७:४० च्या सुमारास डिनो मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला.

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी २००५ ते २०२१ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. यासाठी ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याच्या कंत्राट प्रकरणी यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. २०१७ ते २०२१ या वर्षांदरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

१३ जणांवर गुन्हा दाखल
डिनोने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. तो त्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. डिनो हा आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय अशीही ओळख असल्याने या चौकशीला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही कंत्राटदार आणि काही अधिकारी देखील आहेत.

Previous Post

हगवणे प्रकरणी कोर्टाने पोलिसांना फटकारले

Next Post

स्मार्ट बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली

Next Post
स्मार्ट बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली

स्मार्ट बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले
  • मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी
  • एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.