Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

राज्यात आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 4, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण
0
SHARES
12
VIEWS

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ व्हावी, या उद्देशाने हे पाऊल टाकण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली.


इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लागावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे ते म्हणाले.


जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना नुकतेच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौ-यावर पाठवण्यात आले होते. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्र प्रथम ही संकल्पना आढळून आली. त्यामुळे हाच दुवा पकडत राज्यातही राष्ट्र प्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री भुसे यांनी दिली.
यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली. इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे दादा भुसे म्हणाले.


माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील २.५ लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण दिल्याने राष्ट्रीय भावना दृढ होतील, असा दावाही त्यांनी केला.

Previous Post

आरसीबीने संपविला आयपीएल चॅम्पियनशीपचा दुष्काळ

Next Post

यंदाचा ‘ग्लोबल पुलोत्सव‘ ९ जूनपासून रंगणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post
यंदाचा ‘ग्लोबल पुलोत्सव‘ ९ जूनपासून रंगणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

यंदाचा ‘ग्लोबल पुलोत्सव‘ ९ जूनपासून रंगणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.