जिंद ते सोनिपत ट्रायल सुरू, ३५ गाड्या सुरू करण्याची तयारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लवकरच हायड्रोजनवर चालणारी ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचे ट्रायल सुरू झाले. ही ट्रेन हरियाणातील जिंद आणि सोनीपत मार्गावर धावणार आहे. हायड्रोजन ट्रेन इतर ट्रेनपेक्षा वेगळी आहे. ही ट्रेन सर्वात पर्यावरणपूरक आहे.ही ट्रेन चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवली आहे. ८९ किलोमीटरच्या या मार्गावर ट्रेनचे ट्रायल सुरू झाले. ही ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने धावू शकते. या ट्रेनमध्ये १२०० हॉर्सपॉवरची क्षमता आहे. यातून एका वेळी २६३८ प्रवासी प्रवास करू शकतात.
हायड्रोजन ट्रेन इतर ट्रेनपेक्षा खूप वेगळी आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले की वीज तयार होते. हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल असतो. त्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रतिक्रियेतून वीज तयार होते. यामुळे फक्त पाणी आणि ऊर्जा तयार होते. त्यामुळे हे पर्यावरणासाठी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे.
जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन
रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन इंधन सेलवर आधारित ट्रेन बनवण्यासाठी २८०० कोटी रुपये दिले आहेत. त्यातून ३५ ट्रेन्स बनवल्या जाणार आहेत. ८ डब्यांची ही ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने धावणारी जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेनपैकी एक असेल. पर्यावरणपूरक असणारी ही ट्रेन कार्बन उत्सर्जन कमी करणार आहे.
३५ हायड्रोजन रेल्वे सुरू करण्याची तयारी
भारतीय रेल्वे हायड्रोजन फॉर हेरिटेज या प्रोजेक्ट अंतर्गत हेरिटेज मार्गांवर ३५ हायड्रोजन ट्रेन्स चालवण्याची तयारी करत आहे. यासाठी सरकारने २८०० कोटी रुपये दिले आहेत. या मार्गांवर हायड्रोजन संबंधित सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ६०० कोटी रुपये वेगळे ठेवले आहेत.
हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये
-भारतात तयार झालेले हायड्रोजनवर चालणारे रेल्वे इंजिन आपल्या देशातील लोकांनी बनवले आहे.
-जिंद आणि सोनीपतच्या मध्ये ८९ किलोमीटरच्या मार्गावर हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल सुरू झाले आहे. ही ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने धावू शकते.
-१२०० हॉर्सपॉवरची क्षमता असलेली ही ट्रेन एका वेळी २६३८ प्रवाशांना घेऊन जाऊ शकते.
-सध्या जगात फक्त चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणा-या ट्रेन्स आहेत. या ट्रेन्स ५०० ते ६०० हॉर्सपॉवरच्या दरम्यान ऊर्जा तयार करतात.
-भारतात बनवलेल्या हायड्रोजन ट्रेनच्या इंजिनची क्षमता १,२०० हॉर्सपॉवर आहे, जी आतापर्यंत सर्वात जास्त आहे.
