Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

ना. चंद्रकांत पाटील यांच्या वतीने आयोजितसंतपूजन सोहळा उत्साहात

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 10, 2025
in महाराष्ट्र
0
ना. चंद्रकांत पाटील यांच्या वतीने आयोजितसंतपूजन सोहळा उत्साहात
0
SHARES
11
VIEWS

वारकऱ्यांच्या सेवेतून मिळणारे समाधान, त्यांचे चेहऱ्यावरील भाव, आणि संतांची कृपा यांचे अनुभव शब्दात मांडणे कठीण – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे आषाढी वारी. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीसाठी सज्ज होणाऱ्या वारकऱ्यांना पारमार्थिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम तसेच ‘संत पूजन’ रविवारी मोठ्या श्रद्धेने उत्साहात संपन्न झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतांचे पाद्यपूजन करण्याचे आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याचे भाग्य लाभले. वारकऱ्यांच्या सेवेतून मिळणारे समाधान, त्यांचे चेहऱ्यावरील भाव, आणि संतांची कृपा यांचे अनुभव शब्दात मांडणे कठीण असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस माऊली महाराज कदम यांची सुश्राव्य कीर्तनसेवा यावेळी उपस्थिताना श्रवण करण्यास मिळाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक संतांचे पाद्यपूजन केले . वारकरी फेटा बांधून यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पाटील म्हणाले, गेले तीन वर्ष सातत्याने हा उपक्रम आपण करत आहोत. या कार्यक्रमात खूप मोठमोठे संत, प्रवचनकार येतात, त्यांची प्रवचन होतात, भजन होतात, कीर्तनं होतात. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक साहित्य यावेळी वाटप करण्यात येते. यंदाच्या वर्षी जवळपास ५० दिंड्यांना आपण तंबू देत आहोत. तर काही दिड्याना टाळ , पखवाज देत आहोत, तर काही दिंडयांना सतरंज्या देत आहोत. एक फोल्ड होणार बिछाना देखील यावर्षी दिला जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

पाटील पुढे म्हणाले २१ तारखेला योग दिनाला १२०० ठिकाणी १२०० पालख्यांची जी पुण्यात मुक्कामाची ठिकाण आहेत त्या ठिकाणी ते योग करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी एका ठिकाणी उपस्थित राहत एका दिंडीसोबत योग करणार आहेत. हे योग करत असताना १२०० ठिकाणी ते दिसणार आहे. त्यावेळी पुण्यात ६ लाख वारकरी योग करणार आहेत. जागतिक विक्रम याठिकाणी केला जाणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.

Previous Post

आयसीसी हाॅल ऑफ फेममध्ये धोनीला स्थान

Next Post

मराठा आरक्षण वैधतेवर बुधवारपासून सुनावणी

Next Post
मराठा आरक्षण वैधतेवर बुधवारपासून सुनावणी

मराठा आरक्षण वैधतेवर बुधवारपासून सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.