Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

यूपीतील बुलडोझरराजला मोठा दणका

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 2, 2025
in state
0
0
SHARES
2
VIEWS

सुप्रीम आदेश, ज्यांची घरे पाडली, त्यांना १० लाखांची नुकसान भरपाई द्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अलिकडे उत्तर प्रदेशात बुलडोझरराजने सपाटा लावला होता. कुठे बेकायदेशीर कृत्य समोर् आले की, बुलडोझर लावून घरे पाडण्याचे काम उत्तर प्रदेशातील योगी सरकारने केले. हाच बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रातही सुरू झाला होता. मात्र, यावरून आधी महाराष्ट्र सरकारला फटकारले असतानाच आता योगी आदित्यनाथ सरकारलाही याच मुद्यावरून फैलावर घेतले आणि प्रयागराजमधील ज्या घरावर बुलडोझर चालविले, त्यांना १० लाखांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिला. त्यामुळे बुलडोझरबाबांना (योगी आदित्यनाथ) चांगलाच झटका बसला आहे.

गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा नवा पॅटर्न अस्तित्त्वात आणणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने मोठा झटका बसला. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला बुलडोझर कारवाई करुन घरं पाडलेल्या प्रयागराजमधील संबंधित लोकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. २०२१ साली प्रयागराजमध्ये योगी सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात हा आदेश देण्यात आला.

या कारवाईत प्रयागराज विकास नियामक मंडळाने एक वकील, प्राध्यापक आणि तीन व्यक्तींच्या घरावर बुलडोझर चालवला होता. सर्वोच्च न्यायालयाने यावरुन योगी सरकारचा कान पिळत ही कारवाई अनधिकृत आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश ‘बुलडोझर बाबा’ म्हणून देशभरात प्रसिद्धी मिळवलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारची कानउघडणी करताना अशा प्रकरणांमध्ये घरं पाडण्यात आलेल्या संबंधितांना सहा आठवड्यात प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. अशा घटना या मानवी सदसद्वविवेकबुद्धीला धक्का देणाऱ्या आहेत. घरे पाडण्याची ही कारवाई अनधिकृत आहे. आम्हाला जमिनीच्या मालकीच्या विषयासंदर्भात कोणतीही टिप्पणी करायची नाही. मात्र, घरे पाडण्यात आलेल्या लोकांना तातडीने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे सरकारी यंत्रणेला समजेल की, कोणतीही कारवाई करताना योग्य ती प्रक्रिया पार पाडली पाहिजे.

घर हा मूलभूत अधिकार
डोक्यावर छत असणे हा भारतीय संविधानातील कलम २१ नुसार नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. ही गोष्ट सरकारी यंत्रणांनी लक्षात ठेवली पाहिजे. सरकारी यंत्रणांनी अशाप्रकारे घर पाडणे हा असंवेदनशीलतेचा कळस आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने प्रयागराजमधील कारवाई ही धक्कादायक आणि चुकीचा पायंडा पाडणारी असल्याचेही म्हटले. लोकांना २४ तास आधी नोटीस देऊन घरं पाडणे, हे अवैध आहे, असे म्हटले. एवढेच नव्हे तर पुढील काळात अशा कारवाया कुणीही करू नये, असेही बजावले आहे.

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
state
state
Previous Post

एप्रिल ते जूनदरम्यान सूर्य आग ओकणार!

Next Post

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्णयाचा धडाका

Related Posts

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
state

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

July 22, 2025
सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट
state

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 19, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?
state

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग
state

३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

July 1, 2025
state

७६ लाख वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

June 26, 2025
११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
state

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

June 17, 2025
Next Post

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्णयाचा धडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.