Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

आधार प्रमाणीकरण असेल तरच तात्काळ तिकीट

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 12, 2025
in राष्ट्रीय
0
आधार प्रमाणीकरण असेल तरच तात्काळ तिकीट
0
SHARES
5
VIEWS


रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमावलीत १ जुलैपासून बदल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केल्याप्रमाणे तात्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. या बदलांची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार १ जुलैपासून आयआरसीटीसी खाते आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे तर १५ जुलैपासून आधार ओटीपीद्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येणार आहे.

तात्काळ तिकिट बुकिंग करताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रवाशांकडून सातत्याने आवाज उठवला जात होता. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवे बदल जाहीर केले आहेत. रेल्वेच्या तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असल्याचे जाहीर केले. या सुधारणा यूजर्सचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि तात्काळ तिकिटांचा गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत.

नवे बदल पुढील प्रमाणे
-ऑनलाईन तात्काळ आरक्षणासाठी आधार प्रमाणीकरण
दि. १ जुलैपासून आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे तात्काळ तिकिटांचे आरक्षण फक्त आधारने प्रमाणित केलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. याचसोबत १५ जुलै २०२५ पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल.

  • पीआरएस काउंटरवर आणि मध्यस्थांच्या माध्यमातून तात्काळ तिकीट आरक्षणासाठी प्रणाली आधारित ओटीपी प्रमाणीकरण :
    संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर आणि अधिकृत मध्यस्थांद्वारे (एजंट्स) आरक्षित तात्काळ तिकिटांसाठी आरक्षण करताना वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल. ही तरतूद १५ जुलै २०२५ पासून लागू होईल.
Previous Post

छ. संभाजीनगरमध्ये भिंत कोसळून २ महिला ठार

Next Post

बोगस खते, किटकनाशके तयार करणा-यांविरुद्ध कठोर कायदा

Next Post
बोगस खते, किटकनाशके तयार करणा-यांविरुद्ध कठोर कायदा

बोगस खते, किटकनाशके तयार करणा-यांविरुद्ध कठोर कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.