Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 15, 2025
in महाराष्ट्र
0
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
0
SHARES
19
VIEWS


६ जण गंभीर जखमी, ५० जणांना वाचविण्यात यश
पुणे : प्रतिनिधी
रविवार, दि. १५ जून २०२५ पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार ठरला. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांत एका मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यावेळी लोखंडी पुलावर १०० हून अधिक पर्यटक अल्याची माहिती आहे.
सुट्टीचा दिवस असल्याने इंद्रायणी नदीवरचा प्रसिद्ध कुंडमळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी केली होती. पण दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नदीवरचा हा कमकुवत पूल कोसळला आणि एकच हाहाकार उडाला. मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता. तसा बोर्डही साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशासनाकडून लावण्यात आला होता. पण याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभिर्याने पाहिले, ना प्रशासनाने काळजी घेतली. अखेर ज्याची भीती होती, तेच रविवारी झाले. पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफच्या तुकड्या आणि इतर बचावपथके दाखल झाली आणि तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. दुर्दैवाने या दुर्घटनेत काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गिरीश महाजनांनी गर्दीमुळेच हा पूल कोसळल्याचे म्हटले. पण महत्वाची बाब ही की पूल जीर्ण झालेला असताना इथल्या प्रशासनाने इथून नागरिकांना ये-जा करण्याची परवानगी का दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. पूल कोसळला, त्यावेळी पुलावर ५० ते १०० पर्यटक होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. जवळपास ३८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पूल दुर्घटनेत ४ जणांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अंधार पडल्यानंतर बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र तरीही वाहून गेलेल्यांचा शोध सुरू होता. हा पूल जुना झाला हे माहीत असूनही, तशा सूचनाही देऊनही पुलाचा सुरू असलेला वापर हा झाला नागरिकांचा निष्काळजीपणा. पण पर्यटनस्थळ असलेल्या या गर्दीच्या ठिकाणी लक्ष न देणे, धोकादायक जुन्या पुलाची डागडुजी किंवा नवा पूल न उभारणं हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी ५ लाखांची मदत
इंद्रायणी नदीवरील भीषण दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, काही जण लोखंडी पुलाखाली दबल्याचे सांगितले जात आहेत. जवळपास ३५ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल

Next Post

संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?

संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.