इस्लामाबाद : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आणि तणाव वाढत चालला आहे. या दोन देशांतील युद्धाची धग आता इतर देशांनाही बसत आहे. विशेष म्हणजे आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानदेखील या युद्धात धुमसत आहे. युद्धाचा परिणाम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतावर झाला. येथे इंधनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे बलुचिस्तान प्रांतात इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. कारण बलुचिस्तानमधील अधिकाधिक भाग हा इराणकडून दिल्या जाणा-या तेलावर अवलंबून आहे.
बलुचिस्तान प्रांत इराण आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्या सीमेलगत आहे. बलुचिस्तानच्या प्रशासनाने सुरक्षेच्या कारणामुळे इराणलगतच्या सर्व सीमा सध्या बंद केल्या आहेत. तेथील पंजगूर आणि ग्वादर जिल्ह्यात असलेल्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे तेल पुरवठा बंद पडला आहे. परिणामी इंधनासोबतच खाण्याच्या वस्तूंचाही तुटवडा जाणवतो आहे. ग्वादर जिल्ह्यातील गब्दकालातो हा बॉर्डर पॉइंट हा इराणी तेल व्यापारासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे. हाच रस्ता आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. सध्या तेलसंकट आल्यामुळे पाकिस्तानच्या सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. पेट्रोलची किंमत ४.८० पाकिस्तानी रुपयांनी तर डिझेलची किंमत ७.९५ पाकिस्तानी रुपयांनी वाढवण्यात आली.तेल तस्करीच्या व्यवसायाला आळासध्या बलुचिस्तानमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत असला तरी पाकिस्तानी सरकारने घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले आहे.
क्वेटा यासारख्या मोठ्या शहरांत पेट्रोल पंप चालूच आहेत. तिथे इंधनाची कमतरता नाही. लोक इराणमधून तस्करी करून तेल विकायचे. त्यांचा हा व्यवसाय आता बंद झाला आहे. त्यामुळे ते जनतेत इंधन तुटवडा असल्याच्या अफवा पसरवत आहेत, असा दावा तेथील सरकारने केला. बलुचिस्तानमधील पेट्रोल पंप बंदबलुचिस्तानमधील अनेक पेट्रोल पंप हे इराणमधून तस्करीच्या माध्यमातून आणलेल्या तेलावर तसेच डिझेलवर अवलंबून आहेत. आता इस्रायलसोबत चालू असलेल्या युद्धामुळे आता रविवारपासून बलुचिस्तानमधील पेट्रोल पंप बंद झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांना इंधन मिळत नाही.