Wednesday, June 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 18, 2025
in महाराष्ट्र
0
सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून या कामांना गती द्यावी असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व विदर्भ विकास महामंडळाकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस आमदार सर्वश्री अनुप अग्रवाल, राम भदाणे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, श्याम खोडे, संजय पुराम, चंद्रकांत रघुवंशी, अमश्या पाडवी, वसंत खंडेलवाल, खासदार शोभा बच्छाव ,माजी मंत्री सुभाष भामरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे तापी  व विदर्भ विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध सिंचन योजनेच्या कामांचा आढावा  घेताना मंत्री महाजन म्हणाले, सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी. धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याकरिता महत्त्वाचे असलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत आवश्यक भूसंपादन करण्याबाबत कार्यवाही करावी. याबाबतचा  प्रस्ताव सादर करावा. गोंदिया जिल्ह्यातील कुवाडास नाला प्रकल्पासाठी  आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्याबाबतची कामे कालबद्ध पद्धतीने करावीत.

मंत्री महाजन यांनी जामनेर येथील भागपूर उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेऊन वाघूर उपसा सिंचन योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून घेण्यात येणाऱ्या शेततळ्यांची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेळगाव बँरेजवरील यावल उपसा सिंचन योजना कामांना गती देण्याबरोबरच अमोदा सहकारी उपसा सिंचन योजना, बामनोद सहकारी उपसा सिंचन योजना आणि दादासाहेब जि. तु. महाजन सहकारी उपसा सिंचन योजना भालोद कामाचा आढावा घेऊन या योजनेच्या कामाबाबतही सूचना दिल्या.

बैठकीत तापी प्रकाशा बुराई उपसा सिंचन प्रकल्पाचा आढावा, अक्कलपाडा (निम्न पांझरा) धरण पूर्ण क्षमतेने भरण्या संदर्भात अतिरिक्त भूसंपादन करणे तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता बाबत भागपूर उपसा सिंचन योजना, टप्पा-१ व टप्पा २ ता. जामनेर,  वाघुर प्रकल्प शेततळयांच्या व उर्वरित कामांसदंर्भात, ता. जामनेर, यावल उपसा सिंचन योजना (उध्भव शेळगांव बॅरेज) ता. यावल, जि. जळगाव व बामनोद, भालोदा, आमोदा प्रकल्पांची आढावा, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत कुवाडहास नाला प्रकल्प आढावा, इसापूर जलाशय उपसा सिंचन योजना प्रस्तावित करणे, अकोला शहर विकास योजनेसाठी पाटबंधारे विभागाद्वारे विट्टपा व मोर्णा नदीचे निळी व लाल ते रेष आखणी सर्व्हेक्षण नकाशे निरस्त करणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Previous Post

राज्यात सुमारे ११.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन
  • राज्यात सुमारे ११.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या
  • आणीबाणीत कारावास,मानधन मिळणार दुप्पट
  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.