सप्रेम नमस्कार,
माझे लहानपणीचे दोस्त, शून्यातून विश्वनिर्मिती करुन संस्कारी कुटुंब घडविणारे आध्यात्मिक व्यक्तिमत्व, दिलदार आणि निर्मळ मनाचे बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू घोलप अर्थात श्री. राजाभाऊ कांतीलाल घोलप व सौ. उज्वला वहिनी यांची कोल्हापुरस्थित कन्या सौ.भाग्यश्री व दीपक क्षीरसागर यांची मुलगी श्रिया हिने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गुरुकुल प्रज्ञाशोध परिक्षेत ती राज्याच्या गुणवत्ता यादीत आली. तिच्या या यशाबद्दल तिला इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली आहे.श्रीयाच्या यशा बद्दल माझ्या व माझ्या कुटुंबाच्यावतीने तसेच राजू घोलप मित्रमंडळाच्यावतीने खूप खूप अभिनंदन!
राजा माने,
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.