भाजपा नेते महेश पवळे यांच्या पुढाकाराने कोथरूडमध्ये लहान मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीसवितरण समारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा नेते महेश पवळे यांच्या पुढाकाराने कोथरूडमध्ये लहान मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रविवारी या स्पर्धेचा बक्षीसवितरण समारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला.
आज या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्याचा सन्मान मला लाभला, याचा अतिशय आनंद होत असल्याच्या भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
विविध गटांतील स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने विविध रंगांनी कॅनव्हास सजवले आणि परीक्षकांची व उपस्थितांची मने जिंकली. सर्व विजेत्यांना व सहभागी प्रत्येक स्पर्धकास आकर्षक बक्षिसे चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी पाटील यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेश पवळे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ती थाप नक्कीच मला पुढील कार्य करण्यास प्रेरणादायी असेल, असे महेश पवळे यांनी म्हटले.
या कार्यक्रमाला भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, शिवरामपंत मेंगडे यांच्यासह भाजपा कोथरूड मंडलातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.