गोपालगंज : वृत्तसंस्था
सोने, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी विमानतळावर केलेले अनेक जुगाड आपण पाहिले. बिहारमध्ये दारुबंदी आहे. म्हणजे दारू मिळत नाही असे नाही. चोरून का होईना दारू मिळतेच. दारूची तस्करी करण्यात येते. दारुच्या तस्करीसाठी काही तरी युक्ती वापरली जाते. एका पट्टयाने तर दारूसाठी चक्क सिलिंडरचा वापर केला.
बिहारमध्ये दारुबंदी आहे. गोपालगंजमध्ये एका तस्कराने सिलेंडरमध्ये दारुची तस्करी केली. ही घटना कुचायकोट येथील मैरवा पूल जवळ घडली. पोलिसांनी सिलेंडरमधून १५ लिटर परदेशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. दारू तस्करी करून उत्तर प्रदेशातून बिहारमध्ये आणण्यात येत होती. पोलिसांना खबऱ्याकडून या प्रकाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तस्कराला अटक केली.
कायद्याने बिहारमध्ये दारूबंदी आहे. पण दारू विक्रेते नवनवीन जुगाड करतातच. ते ग्राहकांपर्यंत दारू पोहचवण्यासाठी वेगवेगळे ट्रिक्स शोधतात. पोलिसांनी सांगितल्यानुसार तस्कर हे उत्तर प्रदेशातून सिलेंडरमध्ये दारू भरून बिहारमध्ये आणत होते. कुचायकोट येथील मैरवा पुलाजवळ या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. तस्करांनी सिलेंडरमध्ये लपवलेली १५ लिटर परदेशी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली. दारुच्या तस्करीसाठीचा हा जुगाड पाहून पोलीस ही अवाक झाले.
पोलिसांनी तस्कराला केली अटक
पोलिसांनी सुरज नावाच्या तस्कराला अटक केली आहे. तो उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहीराज पोलीस ठाण्यातंर्गत हरिहरपूर गावातील रहिवाशी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरमध्ये दारुच्या छोट्या बाटल्या टाकून बिहारमध्ये आणत होता. घरगुती गॅस सिलेंडर असल्याने त्याच्यावर कुणाचा संशय गेला नाही. त्यामुळे त्याला सहज धुळफेक करता आली. कधी अँम्बुलन्स, कधी स्कॉर्पियो तर कधी ट्रकांमध्ये विविध वस्तू आणत तस्करी करण्यात येत असल्याचे यापूर्वी दिसून आले होते. आता तर या तस्कराने हद्द केली आहे. त्यावर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.