Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

नीती आयोगाकडून चतरा जिल्ह्याला आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात देशात पहिले स्थान

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 28, 2025
in राष्ट्रीय
0
नीती आयोगाकडून चतरा जिल्ह्याला आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात देशात पहिले स्थान
0
SHARES
8
VIEWS

आयएएस रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी

चतरा जिल्ह्याला मिळणार १० कोटी रुपयांचा पुरस्कार

⸻

चतरा : प्रतिनिधी
भारत सरकारच्या नीती आयोगाने मार्च २०२५ महिन्याच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या (अ‍ॅसपायरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम) डेल्टा रँकिंगमध्ये झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षी जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या सन्मानाबरोबरच चतरा जिल्ह्याला १० कोटी रुपयांचा पुरस्कार केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.

नीती आयोगाचा हा कार्यक्रम म्हणजे अशा मागास जिल्ह्यांमध्ये सतत मूल्यांकनावर आधारित गतीशील सुधारणा घडवून आणण्यासाठी तयार केलेली एक कार्यप्रणाली आहे. या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व जलसंधारण, आर्थिक समावेशन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील सूचकांकांवर जिल्ह्यांचे नियमित मूल्यांकन केले जाते. चतरा जिल्ह्याने या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून बालक व माता आरोग्य तपासणी, पोषण आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जलव्यवस्थापन, कृषी सल्ला, योजनांची थेट अंमलबजावणी आणि मूलभूत सुविधांचा विस्तार या दिशेने विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

आयएएस रमेश घोलप यांचा जिल्हाधिकारी कार्यकाल,चतरा जिल्ह्याच्या परिवर्तनाची दिशा

मार्च २०२४ ते मे २०२५ या कालावधीत आयएएस रमेश घोलप यांनी चतरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांना प्रभावीपणे स्थानिक स्तरावर अंमलात आणले. सरकार आप के द्वार, जनता दरबार, स्वास्थ्य शिबिरे, ग्राम पातळीवर सरकारी योजनांचे कॅम्प, जिला खनिज ट्रस्ट च्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावी योजना, आदिम जनजाती सर्वे व डोर टू डोर कॅम्प आदी उपक्रम स्थानिक स्तरावर प्रभावीपणे राबवले गेले. त्यांच्या कामकाजाची पद्धत ही मैदानात उतरून, थेट संवाद साधणारी आणि समस्यांवर तत्काळ कृती करणारी होती.

प्रभावी अंमलबजावणी आणि जनतेशी थेट संपर्क
शेती व जलसंधारण, आरोग्य सुविधा, पोषण आहार, शैक्षणिक दर्जा, पीएमएवाय घरकुल योजना, एसएचजी महिला सक्षमीकरण, वीज आणि रस्ते सुविधा यांच्यासोबतच अफू शेतीविरोधात मोहीम आणि जनजागृती केली गेली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे शांततेत आयोजन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शासकीय योजनांची लोकांपर्यंत थेट पोहोच हे या कालावधीचे ठळक विशेष होते.

जनतेचा जिल्हाधिकारी म्हणून निर्माण झालेली ओळख
आयएएस रमेश घोलप यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय शिस्तीबरोबरच मानवी मूल्ये आणि लोकसंपर्क यांना प्राधान्य दिले. प्रशासन जनतेसाठी खुले, उत्तरदायी आणि संवेदनशील व्हावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांची ओळख गरिबांचा डीसी, जनतेचा अधिकारी म्हणून लोकांमध्ये बळकट झाली.

Previous Post

कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

Next Post

महाराष्ट्रातील १३८ थिएटरमध्ये “सजना” गाजतोय.. बार्शीकरांनो बुकिंग आजच करा…!

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post
महाराष्ट्रातील १३८ थिएटरमध्ये “सजना” गाजतोय.. बार्शीकरांनो बुकिंग आजच करा…!

महाराष्ट्रातील १३८ थिएटरमध्ये "सजना" गाजतोय.. बार्शीकरांनो बुकिंग आजच करा…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.