ब्रासिलिया : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी ५ देशांच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर या दौऱ्याची माहिती दिली आणि खास फोटो शेअर केले. त्यांना बुधवार, दि. ९ जुलै २०२५ रोजी ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी ब्राझील आणि भारतातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला.
पीएम मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर सोशल मीडिया एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होण्याचा आशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये पहिल्या ब्रिक्स संमेलनात सहभागी झाले. मग ते सोमवारी ब्रासिलिया येथे पोहचले. ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसियो मोंटेइरो फिल्होने त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रासिलिया येथील विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी पारंपारिक ब्राझिलियाई सांबा रेगे नृत्य सादर केले. यावेळी शिव स्त्रोत्र, गणेश वंदना आणि इतर भारतीय परंपरांचे दर्शन येथे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६-७ जुलै रोजी रियो डी जेनेरियो येथील ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी झाल्यानंतर ब्रासिलिया येथे पोहचले.
या यात्रेदरम्यान ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डी सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि जागतिक मंचावर दोन्ही देशांमध्ये सहयोग वाढवल्याबद्दल देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने मोदींना सन्मानित करण्यात आले.
अनेक मुद्यांवर द्विपक्षीय वार्ता
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांच्याशी, व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, उद्योग, औद्योगिकीकरण, कृषी, आरोग्य आणि दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासंदर्भात व्यापक चर्चा केली तर अनेक करार दोन्ही देशांमध्ये झाले.
मोदी ब्रिक्स संमेलनात सहभागी
इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स संमेलन अत्यंत फलदायी ठरल्याची माहिती दिली. या संमेलनादरम्यान पंतप्रधानांनी जगातील अनेक बड्या नेत्यांशी अनेक विषयावर गहन चर्चा केली. या संमेलनातून भारताची जागतिक मंचावर एका विश्वसनीय मित्र म्हणून वेगळी ओळख निर्माण झा