आवाज दाबण्यासाठीच माझ्या एकट्यावर आरोपपत्र : आ. रोहित पवार
बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. यावर आ. पवार यांनी १०० लोकांची नावे नाबार्डने घेतली. त्यात ईडीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ९७ लोकांची नावे आहेत. यामध्ये माझे नाव नव्हते. मात्र आता ९७ लोकांची नावे बाजूला ठेवून मुद्दाम माझे नाव घेऊन माझ्या एकट्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून होत आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार आणि त्यांच्या एजन्सीज करीत आहेत, असा आरोप केला.
ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत यावर सविस्तरपणे भाष्य केले. या प्रकरणी आम्ही न्यायालयात लढाई लढणार आहोत. सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई लढणार आहोत. आम्ही पळून जाणार नाही, आम्ही लाचार होणार नाही, असे आ. रोहित पवार म्हणाले. ईडीने केलेल्या एफआयआरमध्ये माझे नाव नव्हते. ९७ लोकांचे एफआयआरमध्ये नाव नव्हते. मात्र, मुद्दाम माझे नाव घेण्यात आले. माझी ईडीकडून अनेक वेळा १२ तास चौकशी करण्यात आली. कारखान्याची एक एकर जमीन मी विकली नाही. अधिवेशनात मी एकटाच सरकार विरोधात बोलत आहे, असे रोहित पवार म्हणाले.
आता १८ तारखेनंतर
न्यायालयीन लढाई
१८ तारखेनंतर आमचा लढा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल, एमएसी बँककडून कधी कर्ज घेतलेले आहे तर ते २०१२ मधील आहे, त्यासाठी हे आरोपपत्र दखल केले होते. एका कारखान्यासाठी कर्ज घेतले होते, २००९ ला कन्नड सहकारी साखर कारखाना घेतला आहे. तिस-यांदा कन्नड कारखान्याचे टेंडर निघाल्यानंतर बारामती अॅग्रोने हा कारखाना घेतला, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.