Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
July 23, 2025
in राष्ट्रीय
0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
0
SHARES
2
VIEWS


१ ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा सन्मान प्रदान केला जाईल. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.

यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्कारासाठी नितीन गडकरींना निवडण्यामागचे कारण सांगितले. यामागे त्यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासातील भरीव योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले, असे डॉ. रोहित टिळक म्हणाले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नांनी लोकचळवळीचे स्वरूप आले.


लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत नितीन गडकरी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची विक्रमी वेळेत उभारणी हे त्यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यात त्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रारूप यशस्वीपणे वापरले. देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्त्यांना पर्याय नाही, ही गडकरींची भूमिका महत्त्वाची असल्याचेही डॉ. टिळक यांनी अधोरेखित केले.

पुरस्काराचे स्वरूप आणि इतिहास
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार एस. एम. जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. आजवर अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, मॉटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला आणि सुधा मूर्ती यांचा समावेश आहे.

Previous Post

मिग-२१ लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार

Next Post

भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post
भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.