- जगातील सहावा क्रमांकाचा मोठा धक्का
मॉस्को : वृत्तसंस्था
जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचटकाला धडकला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार भूकंपाची तीव्रता ८.८ होती. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ४ : ५४ वाजता हा धक्का बसला.
कामचटकाला ५ मीटर उंचीपर्यंतची त्सुनामी आली. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १९.३ किलोमीटर खोलीवर होता. कामचटकाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी एक व्हीडीओ पोस्ट केला आणि सांगितले की, आजचा भूकंप दशकांमधील सर्वात शक्तिशाली होता. त्यांनी सांगितले की एका बालवाडी शाळेचे नुकसान झाले आहे. त्सुनामीच्या लाटा अमेरिकेच्या अलास्का आणि हवाई बेटांवर पोहोचल्या आहेत. दरम्यान टोकियोतील २० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले असून जपानच्या पूर्व किना-याजवळ एक फूट उंचीच्या पहिल्या त्सुनामी लाटा आल्या आहेत. राजधानी टोकियोमधील २० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. याशिवाय त्यांच्या फुकुशिमा अणुभट्टीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.