Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

ट्रम्प टॅरिफ ९० दिवसांसाठी स्थगित

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 10, 2025
in राजकीय
0
जागतिक व्यापार युद्धाचा भडका!
0
SHARES
16
VIEWS

७५ देशांना तूर्त दिलासा, चीनवरील आयातशुल्क तब्बल १२४ टक्क्यांवर
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७५ हून अधिक देशांवरील परस्पर आयात शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित केले. तथापि, त्यांनी या सूटमध्ये चीनचा समावेश केलेला नाही, परंतु त्यावरील शुल्क १०४ टक्क्यांवरून १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल ८४ टक्के शुल्क लादल्यानंतर ट्रम्प यांनी ही कारवाई केली.

ट्रम्प यांनी चीनवर संताप व्यक्त करीत त्यांनी जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवलेला नाही. म्हणूनच मी ते शुल्क १२५ टक्क्यापर्यंत वाढवत आहे. पण चीन लवकरच समजेल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस संपले आहेत, अशा शब्दांत बजावले. त्यामुळे व्यापार युद्ध वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषत: अमेरिका आणि चीनमध्ये याची तीव्रता अधिक असेल. इतर देशांनीही ट्रम्प टॅरिफला विरोध केला. परंतु टोकाचा विरोध चीनने केला आणि जशास तसे उत्तर देण्याची योजना आखली. परंतु अमेरिकेने त्याच्या पुढचे पाऊल टाकत चीनवर अधिक आयात कर लावण्याचा धडाका सुरू केला. त्यामुळे आता चीनसाठी आयात कर १२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे भविष्यात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ७५ हून अधिक देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे आणि माझ्या जोरदार सूचनेवर या देशांनी अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर दिलेले नाही. म्हणून मी ९० दिवसांचा विराम स्वीकारला आहे. या टॅरिफवरील विरामामुळे नवीन व्यापार करारांवर वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळेल. अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की, अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास इच्छुक देशांसाठी हा दर १० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. कॅनडा आणि मेक्सिकोमधील काही वस्तूंवर २५ टक्के कर आकारला जातो. आता त्यांचाही बेसलाइन टॅरिफमध्ये समावेश करण्यात आला आहे. तथापि, या बेसलाइन टॅरिफमध्ये युरोपियन युनियनचा समावेश आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

ट्रम्प यांच्या अनेक जवळच्या सल्लागारांनी आणि स्वतः मस्क यांनी टॅरिफ वॉर थांबवण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेतेही या शुल्काच्या विरोधात होते. मिच मॅककोनेल, रँड पॉल, सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी या शुल्कांना असंवैधानिक, अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणारे आणि राजनैतिकदृष्ट्या धोकादायक म्हटले.
या टॅरिफमुळे अमेरिकन बाँड्सची अनपेक्षित विक्री झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली, वॉल स्ट्रीट, बँकांनी इशारा दिला होता की टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई, वाढती बेरोजगारी आणि मंदी येईल.

चीनकडून ४४० अब्ज डॉलर्सची आयात
अमेरिका चीनकडून ४४० अब्ज डॉलर्सची आयात करते. यावर १२५ टक्के कर लादला आहे. चीनमधून उत्पादने आयात करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांसाठी पर्याय शोधणे आता एक मोठे आव्हान बनत चालले होते. अशा परिस्थितीत या कंपन्यांच्या पुरवठा साखळीसाठी इतर देशांवरील शुल्क थांबवणे आवश्यक होते.

Previous Post

बार्शीच्या १० जलतरणपटूंचा जलतरणात जागतिक विक्रम!

Next Post

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

Related Posts

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी

July 6, 2025
पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र !
राजकीय

पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र !

April 28, 2025
पाकिस्तान कंगाल, आता होणार बेहाल!
राजकीय

पाकिस्तान कंगाल, आता होणार बेहाल!

April 25, 2025
माजी आमदार थोपटे भाजपात दाखल
महाराष्ट्र

माजी आमदार थोपटे भाजपात दाखल

April 22, 2025
संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?
महाराष्ट्र

संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?

April 16, 2025
फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार
राजकीय

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

April 10, 2025
Next Post
फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.