Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 19, 2025
in Politics, महाराष्ट्र
0
ठाकरे बंधू एकत्र येणार?
0
SHARES
22
VIEWS


राज ठाकरे यांनी घातली साद, उद्धव ठाकरेही तयार

मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार, दि. १९ एप्रिल २०२५ रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साद घातली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही आॅफर स्वीकारण्यास होकार दिला. मात्र, त्यांनी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली आहे. ती म्हणजे एकदा पाठिंबा द्यायचा आणि पुन्हा विरोध करायचा, मग परत तडजोड करायची हे नाही चालणार. असा ठाम निश्चय असेल तर अजूनही महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याची धमक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे कामगार सेनेतील एका कार्यक्रमात बोलत होते. या अगोदर राज ठाकरे यांनी आमच्यात किरकोळ भांडणे आहेत, ती बाजूला ठेवली तर आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांना साद घातली. त्याला उद्धव ठाकरे यांनी लगेच प्रतिसाद दिला. किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे, मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचे सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची, हे असे चालणार नाही. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचे आगत स्वागत करणार नाही, हे पहिले ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणे मी आज सांगतो, जी भांडणे माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिले हे ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे…प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे…खूप जणांना काही देता नाही आले तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले…आज सुद्धा कायदे आणलेत कामगारांचे त्याला विरोध केलाच पाहिजे…पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो. आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत…शेतकºयांचे कार्य कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला, तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही…त्यांचे मिशन हेच आहे की कोणी एकत्र आला नाही पाहिजे…आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पाहा…मुंबईतसुद्धा काही गोष्टी अदानीच्या कशात घालायच्या…आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचे…आता काय दुर्दैवाने सरकार आले आहे ते आता जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही…तुम्ही मारलेल्या थापा ऐकून मतदान केले असे आपण एक वेळ म्हणू…पण त्यावर आता कोणीच बोलत नाही…


हिंदीवरून राजकारण पेटणार
महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला…जो महाराष्ट्रात राहिला त्याला मराठी ही आलीच पाहिजे…तुम्ही करता हिंदीची सक्ती, आम्ही होऊ देणार नाही हा भाग वेगळा…इथे राहता आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Previous Post

पहिल्या महिन्यातच खाजगी रेल्वेला ७० लाखांचा नफा!

Next Post

इंग्रजीला पालख्या, हिंदीला विरोध हा कुठला विचार?

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
औरंगजेबाची कबर हटविणार नाही

इंग्रजीला पालख्या, हिंदीला विरोध हा कुठला विचार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.