Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

बोगस डॉ. मंडलने घेतला माझ्या मुलीचा जीव

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 22, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
बोगस डॉ. मंडलने घेतला माझ्या मुलीचा जीव
0
SHARES
12
VIEWS

मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप

चंद्रपूर:- वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे डॉ. रुद्र रॉबीन मंडल हे महाकाली क्लिनिक चालवत असून त्यांच्याकडे कुठलीही विद्यकीय पदवी किंव्हा डिप्लोमा नसताना त्यांनी माझ्या समता मोरेश्वर नाईक, वय ११ वर्षे, हिचवर उपचार केला व चुकीचा उपचार केल्याने तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, माझ्या मुलीचा डॉ मंडल यांनी जीव घेतला त्यामुळे बोगस डॉक्टर मंडल हे दोषी असल्याने त्यांचेवर सदोष मनुषयवधाचा गुन्हा दाखल करावा व माझ्या मृत मुलीस न्याय द्यावा अशी मागणी मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आरोग्य व पोलीस प्रशासनाकडे केली आहें, यावेळी मुलीची आई शिला मोरेश्वर नाईक व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाँधे, सुनील गुढे इत्यादीची उपस्थिती होती, दरम्यान धनंजय बोरीकर या मेडिकल चालविणाऱ्या धनंजय बोरीकर यांच्यावर आरोपीला साथ देण्याच्या गुन्ह्यात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

कु. समता मोरेश्वर नाईक, वय ११ वर्षे हिची दि. ३०/०७/२०२४ रोजी प्रकृती बिघडल्यामुळे मुलीच्या वडिलांने तिला उपचाराकरीता महाकाली क्लिनिक डॉक्टर रुद्र रॉबीन मंडल, खांबाडा यांचेकडे नेले होते. त्या दरम्यान डॉक्टर मंडल यांनी तपासणी करुन मुलीला तुराणकर यांच्या खांबाडा येथील लेबोरेटरीमध्ये रक्त तपासणी करण्याकरीता सांगितले होते. त्यानुसार मुलीचे ब्लड तुराणकर यांच्या लॅबमध्ये चेक करुन त्याचा रिपोर्ट सदरच्या डॉक्टरांना दाखविला होता. तो रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मुलीला गोळ्या दवाई देवून आम्हाला घरी पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ३१/०७/२०२४ रोजी बुधवारला डॉक्टरांनी मुलीला घेवून तपासणीकरीता दवाखान्यात या असे मुलीच्या वडिलांना मोबाईल वरून फोन करून सांगितलं.त्या दरम्यान डॉक्टरांनी मुलीला १०० एम.एल. ची सलाईन दिली व त्या सलाईनमध्ये डॉक्टरकडेच उपलब्ध असलेले तिन इंजक्शन दिले व काही वेळाने सुट्टी दिली. त्यानंतर आई वडील मुलगी घरी गेल्यावर अर्ध्या तासानी मुलीला थंडी वाजून मुलीचे शरीर हलू लागले व मुलीची प्रकृती जास्तच खराब झाल्याने मुलीने डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी दिलेल्या सलाईन व इंजेक्शनमुळे मुलगी पुर्णतः लुज/कमकुवत झाली त्यानंतर ती बेहोश झाली. मुलीची अशी अवस्था पाहून आई वडील घाबरले व परत डॉक्टर रॉबीन मंडल, खांबाडा यांच्याकडे तपासणीकरीता घेवून गेले. तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या तोंडावर थंड पाणी मारले व कपडा ओला करुन तिचे शरीर पुसून काढले. त्यानंतर डॉक्टरांनी कोऱ्या चिठ्ठीवर काही औषधी लिहून दिले व काही औषधी त्यांनी मुलीला पाजण्याचा प्रयत्न केला परंतु ती औषधे तिच्या तोंडात जात नसल्याने डॉ. मंडल यांनी पळ काढीत मुलीचा परत एकदा ब्लड चेक करुन दुसऱ्या दवाखान्यात मुलीची तब्येत तपासा असे सांगितले. त्यानंतर मुलीची प्रकृती बघून घाबरलेले वडील यांनी यांनी त्वरीत हिंगणघाट येथील डॉ. वासाडे येथील खाजगी रुग्णालयात तपासणीकरीता घेवून गेले त्यावेळी डॉ. वासाडे यांनी मुलीची तपासणी करुन मुलीच्या वडिलांना सुचविले की, मुलीची प्रकृती फारच गंभीर असल्याने तिला त्वरीत सरकारी दवाखान्यात घेवून जा तर लगेच मुलीला वेळ न घालविता वडिलांनी सरकारी दवाखान्यात घेवून गेले असता डॉक्टरांनी मुलीला एमरजेंसी वार्डमध्ये घेवून गेले व मुलीला तपासण्याच्या दरम्यान मृत घोषित केले. त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजामुळे झाला असल्याचा दुःखद प्रकार समोर आला.

दरम्यान हिंगणघाटच्या सरकारी दवाखाना मधील डॉक्टरांनी मृतक मुलीच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलीचा मृत्यु हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे झालेल्या उपचारामुळे झाला असल्यामुळे आपण त्या डॉक्टरा विरुद्ध पोलीसांकडे गुन्हा नोंद करावा असे सुचविले. त्यानंतर वडिलांनी दि. २६/०९/२०२४ रोजी वरोरा ठाणेदार, तालुका आरोग्य अधिकारी तथा सार्वजनिक आरोग्य पथक वरोरा व तहसिलदार वरोरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला परंतु अजूनपर्यंत महाकाली क्लिनिक रुद्र रॉबीन मंडल, खांबाडा येथील डॉक्टर यांचे विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नसल्याने तो गुन्हा दाखल करावा व माझ्या मुलीला न्याय द्यावा अन्यथा मी आरोग्य विभागा विरोधात आमरण उपोषण करू असा इशारा मृतक मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहें.

Previous Post

१ मे २०२५ पासून एटीएमवरून पैसे काढणे महागणार

Next Post

क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचा घेतला आढावा

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचा घेतला आढावा

क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचा घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.