Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पाकिस्तानची पाणी कोंडी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 24, 2025
in राष्ट्रीय
0
पाकिस्तानची पाणी कोंडी
0
SHARES
16
VIEWS


सिंधू जलवाटपाला स्थगिती, नागरिकांना देश सोडण्याचे आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच अटारी वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्याही पुढे जाऊन भारताने पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली. हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा दणका आहे. दरम्यान, अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारत सरकारने केली असून, अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. एवढेच नव्हे, तर कारवाईसाठी तिन्ही लष्करी दलाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी अंदाधुंद गोळीबार केला होता. या या गोळीबारात २८ पर्यटकांचा जीव घेतला. हे दहशतवादी पाकिस्तामध्ये परत गेल्याची माहिती आहे. त्यानंतर भारताने आता पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहेत. भारताकडून सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या ८० टक्के पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
पाणीवाटपाला प्रथमच स्थगिती
भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी पाण्याच्या वाटपासंदर्भात १९६० साली एक करार झाला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन मोठी युद्धे झाली. त्यावेळीदेखील हा करार पाळण्यात आला होता. त्या कराराला आता स्थगिती देण्याचा निर्णय भारताने घेतला.

सिंधू नदीवर पाकची अर्थव्यवस्था
पाकिस्तानच्या सधन असलेल्या पंजाब प्रांतासह मोठा प्रदेश सिंधू नदीच्या खो-यात वसतो. पाकिस्तानमधील शेती असो वा उद्योग, हे सिंधू नदीच्या खो-यात वसले आहेत. या नदीमुळे पाकिस्तानची शेती फुलली आहे. मोठे जलविद्युत प्रकल्पही याच नदीवर आहेत. याचा फायदा पाकिस्तानलाच होतो. आता कराराला स्थगिती दिल्याने पाकची कोंडी होऊ शकते.

सिंधू पाणी वाटप करार?
सिंधू नदी तिबेटमध्ये उगम पावते आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहते. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या तणावावेळी भारताने १९४८ साली या नदीचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी पाकिस्तानच्या अडचणींत मोठी वाढ झाली. १९५१ साली पाकिस्तानने हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात नेले. पुढे जागतिक बँकेच्या मध्यस्तीने १९ सप्टेंबर १९६० रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये या नदीच्या पाणी वाटपासंदर्भात एक करार झाला. सर्वात यशस्वी पाणी वाटप करारामध्ये या कराराचे नाव घेतले जाते.

४८ तासांत देश सोडा,
पाक नागरिकांना आदेश
बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज जवळपास अडीच तास चाललेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीच्या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले. यावेळी हल्लेखोरांना पाकिस्तानचा पाठिंबा यावरून प्रहार केला. यासंदर्भात पाकिस्तानवर थेट आरोप करीत भारताने पाकिस्तानी दुतावास बंद केला असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. यासोबत सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली. तसेच अटारी चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सार्क अंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारी व्हिसा सूट रद्द करण्यात आली आणि त्या अंतर्गत भारतात राहणा-या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्यास सांगितले. भारताने इस्लामाबादमधून सल्लागारांनाही परत बोलावले असून, उच्चायुक्तांची संख्या ३० पर्यंत कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासंबंधीची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.

Previous Post

पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नियंत्रण कक्ष

Next Post

राज्यातील पर्यटकांना सुखरुप परत आणणार

Next Post
औरंगजेबाची कबर हटविणार नाही

राज्यातील पर्यटकांना सुखरुप परत आणणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.