Friday, June 20, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

विज्ञान, ज्ञानाच्या क्षेत्रात तळपणारा भारतीय तारा हरपला

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 25, 2025
in महाराष्ट्र
0
विज्ञान, ज्ञानाच्या क्षेत्रात तळपणारा भारतीय तारा हरपला
0
SHARES
7
VIEWS

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज, २५ एप्रिल रोजी, बेंगळुरूत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पार्थिव शरीर रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये २७ एप्रिलला दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, इस्रोचे माजी अध्यक्ष, देशाच्या विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, पद्मश्री, पद्म भूषण, पद्मविभूषण के कस्तुरीरंगन यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. नऊ वर्षे इस्रोचे नेतृत्व करताना त्यांनी भारताच्या अंतराळ संशोधनाला आकार आणि दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात इस्रोने अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाला त्यांनी नवी उंची दिली. अनेक तरुण संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केले. नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांचे अमूल्य योगदान होते. कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशासाठी दिलेले निःस्वार्थ योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.

डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी 9 वर्ष इस्त्रो चं नेतृत्त्व केले आहे.डॉ. कस्तुरीरंगन यांनी ऑगस्ट 2003 मध्ये निवृत्त होईपर्यंत अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणूनही काम करत होते. जुलै 2023 मध्ये, श्रीलंकेला भेट देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना उपचारांसाठी विमानाने बेंगळुरूला नेण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलेले होते.

Previous Post

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांचे निधन

Next Post

सिंधू जल करार रद्दचा पाकला फटका?

Next Post
सिंधू जल करार रद्दचा पाकला फटका?

सिंधू जल करार रद्दचा पाकला फटका?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
  • ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे
  • ११ वर्षांत भारतात डिजिटल क्रांती
  • संत तुकाराम महाराजांच्यापालखी सोहळ््याचे प्रस्थान
  • इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.