भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाचा अष्टपैलू शिलेदार
भगवंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार
बार्शी : भारतीय मनोरंजन क्षेत्राने स्वातंत्र्यानंतर जे जे परिवर्तन कलारसिकांच्या पुढ्यात ठेवले, त्यात अगदी बालकलाकार म्हणूनही आपले योगदान दिले,प्रसंगी इतिहास रचणाऱ्या “शोले” च्या निर्मितीत प्रसंगी रमेश सिप्पींचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली,अखियोंके झरोखेसे असो वा सत्तेपे सत्ता, बालिका बधू असो वा अवतार प्रत्येक सिनेमात आपली खास छाप उमटविणाऱ्या महागुरु सचिन यांच्या बद्दल काय काय सांगावे?..२०१७ साली मी सोलापूर लोकमताचा संपादक असताना त्यांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली होती. तेंव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. आता बार्शीची सांस्कृतिक समृद्धी वाढविणाऱ्या भगवंत व्याख्यानमालेत सचिन यांना पाचारण करण्यात मातृभूमी प्रतिष्ठान व भगवंत मल्टीस्टेटचे संस्थापक संतोषकाका ठोंबरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांना यश लाभले आणि बार्शीकराना सचिन यांना ऐकण्याची संधी प्राप्त झाली. चला तर मग भगवंत व्याख्यानमालेच्या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद लुटुया..!
“प्रेरणादायी व्याख्यानांचा उत्सव — भगवंत व्याख्यानमाला २०२५”
मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी व श्री भगवंत मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भगवंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे.
तारीख: २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ वेळ: सायंकाळी ७.०० वा.
स्थळ: यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी
प्रथम पुष्प: सचिन पिळगावकर (मराठी सिनेअभिनेते व दिग्दर्शक)
दुसरे पुष्प: डॉ. सौ. समीरा गुजर जोशी (मराठी सिने अभिनेत्री व लेखिका ) तिसरे पुष्प: सौ.अंजली धानोरकर (उपजिल्हाधिकारी, छ. संभाजीनगर)