Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 10, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला
0
SHARES
15
VIEWS


चार प्रमुख हवाई तळ उद्ध्वस्त, पाकचे कंबरडे मोडले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने आॅपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला हल्ला केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानाने पुन्हा आगळीक करत गेल्या २-३ दिवसांपासून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ले तसेच मिसाईल हल्ला आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारताने या कृतीला चोख प्रत्युत्तर देत पाकचे सर्व हल्ले परतवून लावले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि युद्ध अद्यापही सुरूच आहे. दहशतवादाला आश्रय देणाºया पाकिस्तानला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे.

भारताने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, भारताने शुक्रवार रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक लष्करी आस्थापनांचे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. रात्री भारताने पाकिस्तानच्या चार हवाई तळावर हल्ला चढवला.
तत्पूर्वी पाकने भारताच्या हवाई तळाला लक्ष्य करीत ड्रोनचा मारा केला होता. श्रीनगर, उधमपूरसह जैसलमेर, अमृतसर हवाई तळांना लक्ष्य करीत ड्रोन सोडण्यात आले होते. मात्र, भारताच्या एस-४०० या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने गुरुवारनंतर शुक्रवारी रात्रीही सीमेलगत ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा सातत्याने सुरू ठेवला होता. परंतु भारतीय हवाई दलाने त्यांचे ड्रोेन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. त्यामुळे भारतीय हद्दीत मोठे नुकसान होऊ शकले नाही. पाकिस्तानचा कुटील डाव लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने जिथून भारतीय हवाई तळांना लक्ष्य केले जात होते, त्याच हवाई तळांना लक्ष्य करीत पहाटेच्या सुमारास पाकिस्तानचे चार हवाई तळ उद्ध्वस्त केले.

सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार रावळपिंडीतील नूर खान, चकवालमधील मुरीद आणि शोरकोटमधील रफीकी यांच्या हवाई तळांवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद केले; पेशावरला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) चे विमान पीआयए २१८, जे त्यांच्या हवाई हद्दीतील शेवटचे उड्डाण होते, त्याला क्वेट्टावरून उड्डाण करण्यास भाग पडले.

याचदरम्यान पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद आणि लाहोरसह अनेक शहरांत स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू आले. मात्र भारताने डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र भारतीय हद्दीतच पडले, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला. पण भारताकडून या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेल्या अनेक ड्रोन हल्ल्यांनंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नीलम व्हॅली आणि सियालकोटमध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

एअर डिफेन्स सिस्टीम मजबूत
भारताने सिरसा येथे भारतीय हवाई क्षेत्रात पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला यशस्वीरित्या रोखल्याचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओद्वारे दिसून आले. सीमेवरील गोळीबाराच्या घटनेनंतर जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकाºयांनी रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारताकडून हाणून पाडला जात आहे. सीमावर्ती भागात एस-४००, आकाशतीर, एल-७०, जु-२३ आणि शिल्का यासारख्या उत्कृष्ट हवाई संरक्षण प्रणाली आकाशात वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे नापाक डाव उधळून लावण्यात ही सिस्टीम भारताला मदत करत आहे.

Previous Post

घरेलू कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीचा आढावा

Next Post

पाकचे सहा एअरबेस उद्ध्वस्त

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
Next Post
पाकचे सहा एअरबेस उद्ध्वस्त

पाकचे सहा एअरबेस उद्ध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.