Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 16, 2025
in आंतरराष्ट्रीय
0
इराण-इस्रायल युद्धाच्या पाकला तीव्र झळा
0
SHARES
16
VIEWS

तेहरान : वृत्तसंस्था

इराण आणि इस्रायलमध्ये आता जोरदार युद्ध सुरु झोले. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत आहे. एकेकाळी या दोन देशांमधील मैत्री जय-वीरू मजबूत होती. दोन्ही देशांत चांगले राजनैतिक संबंध होते, दोन्ही देश एकमेकांना लष्करी आणि गुप्तचर माहिती देत होते. एवढेच नव्हे तर हे दोन्ही देश मिळून दुसऱ्या देशांवर हल्ला करत असत. मात्र आता हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू बनले असून, एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. या संघर्षाची सुरुवात इस्रायलने केली. इस्रायलने इराणवह एअर स्ट्राईक केला. त्यानंतर संतापलेल्या इराणनेही इस्रायलवर जोरदार हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या इमारतीवरही जोरदार हल्ला केला. गेल्या ४५ वर्षांत इराण आणि इस्रायलमधील कटुता वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. इस्रायल तेहरानवर आणि तेल अवीवला लक्ष्य करत आहे. संघर्ष इतका वाढला आहे की, अमेरिका, रशिया आणि चीन हे युद्ध प्रेक्षक बनून पाहत आहेत. इस्रायलची स्थापना १९४८ मध्ये झाली. त्यापूर्वी हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. इस्रायलला अमेरिका आणि सोव्हिएत युनियनची मान्यता होती, परंतु अरब देश मान्यतेसाठी तयार नव्हते. त्यामुळे या देशाची स्थापना झाल्यानंतर लगेचच अरब देशांनी या देशावर हल्ला केला. मात्र इस्रायलने युद्ध जिंकले. इराणमध्ये रजा पहलवी हे देशाची सूत्रे सांभाळत होते. त्यांनी इराणला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवले होते. या मैत्रीची सुरुवात १९५० मध्ये झाली. कारण त्यावेळी इराणने इस्रायलला व्यावहारिकदृष्ट्या मान्यता दिली. तसेच जेव्हा इस्रायलला मोठ्या पाठिंब्याची आवश्यकता होती, तेव्हा त्यांना इराणकडून पाठिंबा मिळाला. त्यानंतर तुर्की आणि इथिओपियानेही पाठिंबा दिला होता. जेव्हा जेव्हा इजिप्त, इराक आणि सीरियासारखे देश इस्रायलविरुद्ध बोलले, तेव्हा इराणकडून त्यांना पूर्ण पाठिंबा मिळाला.संरक्षणात सहकार्यइस्रायल आणि इराणमधील वेळेनुसार वाढत गेली. इराणची गुप्तचर संस्था सावक आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद समन्वयाने काम करू लागली. सुरुवातीच्या टप्प्यात मोसादने सावकच्या एजंटनाही प्रशिक्षण दिले. इराणी सैनिक सब मशीन गन आणि इतर शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी इस्रायलमध्ये जात असत. त्यानंतर इराण-इराक संघर्षादरम्यान इस्रायलने मित्राला मदत केली.इस्रायलला केली तेलाची मदतइराणकडे तेलाचे साठे आहे, त्यावेळी इस्रायलला तेलाची गरज होती. १९६० च्या दशकात इस्रायलला इराणकडून नियमित तेलाचा पुरवठा व्हायचा. इराणने इलात-अश्केलोन पाइपलाइन टाकली होती, ज्याद्वारे तेल इस्रायलला जात असे. त्या बदल्यात इस्रायलने इराणला शेती, सिंचन आणि शस्त्रास्त्राचे तंत्रज्ञान दिले होते. इराण आणि इस्रायलने एकत्र येत प्रोजेक्ट फ्लॉवर हा क्षेपणास्त्र कार्यक्रम देखील सुरू केला होता. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी क्षेपणास्त्रे विकसित करणे हे होते. क्षेपणास्त्र असेंब्ली प्लांटदेखील स्थापन करण्यात आले होते. मात्र इराणमधील शाह सल्तनत संपल्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला.आता दोन्ही देश एकमेकांचे शत्रू !इराणमध्ये १९७९ साली इस्लामिक क्रांती झाली आणि शाह यांना पदावरून काढून टाकण्यात आले. यामुळे इस्रायल आणि इराणमधील मैत्री तुटली आणि शत्रुत्व वाढले. इराण एक इस्लामिक देश बनला आणि त्यांनी इस्रायलला शत्रू असे संबोधले. कालांतराने हे शत्रुत्व इतके वाढले की इराण इस्रायलला आपला नंबर १ शत्रू मानू लागला. इराणने हिजबुल्लाह, हमास सारख्या संघटनांना पाठिंबा दिला. त्यामुळे इस्रायलने इराण हा आपल्यासाठी धोका आहे असे समजून दोन्ही देशांमधील वाद आणखी वाढला आणि आता त्याचे यु्द्धात रुपांतर झाले.

Previous Post

इराण-इस्रायल युद्धाच्या पाकला तीव्र झळा

Next Post

मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

Related Posts

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर
आंतरराष्ट्रीय

भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

July 24, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट
आंतरराष्ट्रीय

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025
Next Post
मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.