जम्मू-काश्मिरात अतिरेक्यांचा धुमाकूळ
पहलगाम (जम्मू काश्मीर) : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत १० हून अधिक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यक्तींचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील ३ पर्यटकांचा मृत्यू झाला. दिलीप डिसले, अतुल मोने यांच्यासह आणखी एकाचा यात मृत्यू झाला. हे कुटुंबीय मुंबईतील असून, ते कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. तसेच पुण्यातील कुटुंबीयही येथे हजर होते. त्यातील काही जण जखमी झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला करण्यात आला, त्यामधील हल्लेखोरांनी पोलिसांच्या गणवेश घातले असल्याची बाब समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हा हल्ला सुनियोजतपणे करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पर्यटकांची गर्दी झालेली असताना त्यांना घेराव घालून त्यांची ओळख विचारुन गोळ््या मारणे हे मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीनगरपासून ९० किलोमीटर अंतरावर पहलगाम आहे. काश्मीरच्या सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून पहलगामची ओळख आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्ली आणि मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी दिल्लीत पर्यटनस्थळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. पर्यटन स्थळांवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यास माहिती कळवण्याचे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेतील पीडित प्रगती जगदाळे यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, निर्दोष पर्यटकांना मारलं ते त्यांना महागात पडणार आहे. याचा बदला घेतला जाईल. प्रगती जगदाळे यांच्याशी चर्चा केली, त्या पुण्याच्या आहेत. सर्व दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. सर्वांना नावे विचारत होते आणि नावे विचारुन गोळ््या मारत होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. अमित शाह श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. अमित शाह यांनी मोठ्या अधिकाºयांसोबत बैठकही घेतली.
पुण्यातील गणबोटे कुटुंबावर हल्ला
पुण्यातील संगीता गणबोटे आणि त्यांचे कुटुंब जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. पहलगाममध्ये फिरत असताना हा दहशतवादी हल्ला झाला. यात गणबोटे यांच्यासोबत गेलेल्या चार जणांना इजा झाली आहे. मात्र बाकी जणांचा शोध सुरू आहे. त्यांचा मुलगा कुणाल गणबोटे पुण्यातून जम्मू काश्मीरसाठी रवाना झाले आहेत. गणबोटे यांचे पुण्यातील रस्ता पेठेत फरसाण विक्रीचे दुकान आहे.