state

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल बुधवारी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्यानंतर मध्यरात्री वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ मते पडली. या मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेस, सपासह विरोधी पक्षातील सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. खा. असदुद्दीन ओवेसी यांनी तर या विधेयकाला विरोध करीत विधेयकाची प्रत फाडून ते निघून गेले. तसेच वक्फवर दोन बिगर मुस्लिम सदस्य असतील, तर हिंदू देवतांच्या ट्रस्टवर मुस्लिम का नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी मी या विधेयकाला समर्थन देण्यासाठी उभा आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी ऐकत आहे. काही सदस्यांच्या मनात गैरसमज आहेत. काही जण राजकीय फायद्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरवत आहेत. हा कायदा मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कामात आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीत हस्तक्षेप करतो, असा गैरसमज पसरवला जात आहे. अल्पसंख्याकांना घाबरवून मतांची बँक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमाची नेमणूक होणार नाही. धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनासाठी गैर-मुस्लिमांना नियुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, असे म्हटले. वक्फ हा अरबी शब्द आहे. वक्फचा इतिहास काही हदीसांशी (इस्लामी धर्मग्रंथ) जोडलेला आहे. आजकाल वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने संपत्ती दान करणे. धार्मिक कार्यांसाठी संपत्ती दान करणे म्हणजे वक्फ. इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात वक्फ अस्तित्वात आला. आजच्या भाषेत वक्फ म्हणजे धर्मादाय नोंदणी. यात व्यक्ती आपली संपत्ती, जमीन धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी दान करते. ती परत घेण्याचा कोणताही उद्देश नसतो. दान करणारा खूप महत्त्वाचा असतो. दान त्याच गोष्टीचे करता येते जी आपली आहे. मी सरकारी संपत्ती दान करू शकत नाही किंवा दुस-या कोणाच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही, असे शाह म्हणाले. कायद्याद्वारे धार्मिक कामात हस्तक्षेप नाही वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डची स्थापना १९९५ मध्ये झाली. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक कामात हस्तक्षेप करतो, हे चुकीचे आहे. काही लोक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत आणि मतांसाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत.

कुशल, उपक्रमशील मनुष्यबळासाठी डीपेक्स उपयुक्त

सामाजिक गरजांची पूर्तता डीपेक्सच्या माध्यमातून होणार : चंद्रकांत पाटील पुणे : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीईओपी विद्यापीठ,...

Read more

वक्फ विधेयकावर राज्यसभेतही मोहोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थालोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली. गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी १२ तासांच्या चर्चेनंतर रात्री २.३०...

Read more

अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर

पुढील तीन वर्षांसाठी केली नियुक्ती मुंबई : प्रतिनिधीजागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती...

Read more

वक्फ विधेयकाला लोकसभेत मंजुरी

वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा, विधेयकाच्या बाजूने २८८ मतेनवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल बुधवारी संसदेत वक्फ...

Read more

आयुष्मान भारत, मिशन महाराष्ट्र समितीचे पुनर्गठन

मुंबई : प्रतिनिधीराज्य सरकारकडून आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून डॉ. ओमप्रकाश शेटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात...

Read more

बीडला विकासाच्या वाटेवर आणणार : अजित पवार

बीड : जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम करावे लागेल. कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा....

Read more

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत

चर्चा सुरू, चर्चेसाठी दिला ८ तासांचा वेळनवी दिल्ली : वृत्तसंस्थावक्फ दुरुस्ती विधेयक २ एप्रिल रोजी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर मांडण्यात आले....

Read more

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी निर्णयाचा धडाका

सुटीच्या दिवशी २९० निर्णय, विविध अनुदान, निधी काढून घेतलामुंबई : प्रतिनिधी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार, दि. ३१ मार्च...

Read more

यूपीतील बुलडोझरराजला मोठा दणका

सुप्रीम आदेश, ज्यांची घरे पाडली, त्यांना १० लाखांची नुकसान भरपाई द्या नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअलिकडे उत्तर प्रदेशात बुलडोझरराजने सपाटा लावला...

Read more
Page 1 of 3 1 2 3