state

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल बुधवारी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्यानंतर मध्यरात्री वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ मते पडली. या मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेस, सपासह विरोधी पक्षातील सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. खा. असदुद्दीन ओवेसी यांनी तर या विधेयकाला विरोध करीत विधेयकाची प्रत फाडून ते निघून गेले. तसेच वक्फवर दोन बिगर मुस्लिम सदस्य असतील, तर हिंदू देवतांच्या ट्रस्टवर मुस्लिम का नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी मी या विधेयकाला समर्थन देण्यासाठी उभा आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी ऐकत आहे. काही सदस्यांच्या मनात गैरसमज आहेत. काही जण राजकीय फायद्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरवत आहेत. हा कायदा मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कामात आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीत हस्तक्षेप करतो, असा गैरसमज पसरवला जात आहे. अल्पसंख्याकांना घाबरवून मतांची बँक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमाची नेमणूक होणार नाही. धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनासाठी गैर-मुस्लिमांना नियुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, असे म्हटले. वक्फ हा अरबी शब्द आहे. वक्फचा इतिहास काही हदीसांशी (इस्लामी धर्मग्रंथ) जोडलेला आहे. आजकाल वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने संपत्ती दान करणे. धार्मिक कार्यांसाठी संपत्ती दान करणे म्हणजे वक्फ. इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात वक्फ अस्तित्वात आला. आजच्या भाषेत वक्फ म्हणजे धर्मादाय नोंदणी. यात व्यक्ती आपली संपत्ती, जमीन धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी दान करते. ती परत घेण्याचा कोणताही उद्देश नसतो. दान करणारा खूप महत्त्वाचा असतो. दान त्याच गोष्टीचे करता येते जी आपली आहे. मी सरकारी संपत्ती दान करू शकत नाही किंवा दुस-या कोणाच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही, असे शाह म्हणाले. कायद्याद्वारे धार्मिक कामात हस्तक्षेप नाही वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डची स्थापना १९९५ मध्ये झाली. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक कामात हस्तक्षेप करतो, हे चुकीचे आहे. काही लोक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत आणि मतांसाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत.

एप्रिल ते जूनदरम्यान सूर्य आग ओकणार!

उष्णतेची लाट, महाराष्ट्रासह इतर राज्यांना सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय हवामान विभागाने एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान...

Read more

ऑटो सेटलमेंटची मर्यादा ५ लाखांपर्यंत

ईपीएफओच्या ५ लाख सदस्यांना होणार फायदा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांच्या विविध गरजांसाठी सुरू करण्यात आलेली...

Read more

रेडीरेकनरच्या दरात वाढ, घरे महागणार

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील रेडी रेकनरच्या दरात ४.३९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे राज्यात घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार...

Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महिलेची हत्या

दोघे ताब्यात, बीड गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा दाखलबीड : प्रतिनिधीबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या कळंबमधील...

Read more

औरंगजेबाची कबर हटविणार नाही

पण कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या...

Read more

कोथरुडमधील रस्ते, पाणी प्रश्नी चंद्रकांत पाटील आक्रमक

मुंबई : कोथरूड मधील रस्ते, पाणी प्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर...

Read more

शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही...

Read more

जिल्हा बँका पुनरुज्जीवित करणार

नागपूर : प्रतिनिधीज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर...

Read more

यंदा ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

पाडव्याचा शुभ मुहूर्त, गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के वाढमुंबई : प्रतिनिधीगुढी पाडव्याच्या मुहुर्तावर २०२५ मध्ये राज्यात दुचाकी चार चाकी व अन्य...

Read more
Page 2 of 3 1 2 3