भाजपा संघटन पर्व अंतर्गत मंडल अध्यक्षपदी निवड, भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत नुकतीच मंडल अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अध्यक्ष निवड केली. या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत नुकतीच मंडल अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अध्यक्ष निवड केली. त्यानुसार कोथरुड उत्तर मंडलाच्या अध्यक्षपदी लहू बालवडकर यांची, कोथरूड मध्य मंडलाच्या अध्यक्षपदी निलेश कोंढाळकर यांची, तर कोथरूड एरंडवणे – कर्वेनगर मंडलाच्या अध्यक्षपदी कुलदीप सावळेकर यांची निवड झाली. चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या मेळाव्यात तिघांचेही अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कसबा मतदार संघातील छगन बुलाखे,अमित कंक व प्रशांत सुर्वे यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार हेमंत रासने यांच्यासह शहराचे सरचिटणीस बापू मानकर, प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, योगेश बाचल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.