उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर पाटील यांनी चोख प्रत्युत्तर देखील दिले. राज्यातील 235 आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वमान्य व्यक्तीमत्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठी, ओबीसी देवेंद्रजी विरोधात जाऊ शकत नाहीत. परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, संजय राऊत जे म्हणतील ते खरे आहे, असे म्हणण्यापेक्षा खोट आहे, असेच म्हणता येईल. राज्यातील 235 आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वमान्य व्यक्तीमत्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठा, ओबीसी देवेंद्रजी विरोधात जाऊ शकत नाहीत, असे पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे. तो व्यवहारात येऊ शकणार नाही, असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. राज्यात मराठे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजास आरक्षण दिले नाही, पण ते आरक्षण फडणवीसांनी दिले. ते कधी जातीवाद करत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.