तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
पुणे : महाराष्ट्रातील ढोल-ताशा पथकांना एकत्र आणण्यासोबतच; भौगोलिक परिस्थितीनुसार येणाऱ्या प्रश्नांचा उहापोह करणे आणि पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील ढोल-ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रच्यावतीने पुण्यात करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले. ढोल- ताशा पथकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, समन्वयक प्रताप परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य राजेश पुसेकर, विश्व हिंदू परिषदेचे सुभाष लाडे यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.