बार्शी – शहरातील एकेकाळी वैभवशाली आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले सर्व रुग्णांचे श्रद्धास्थान ठरलेले डॉ. हिरेमठ हॉस्पिटल आता नव्या दिमाखात, नव्या तंत्रज्ञानासह आणि तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरु होत आहे.
या हॉस्पिटलची स्थापना डॉक्टर ए. जी. हिरेमठ आणि ॲड. गंगाधर सोपल यांनी केली होती. त्यांना डॉ. जी. बी. हिरेमठ, डॉ. बी. एम. नेने आणि डॉ. सुमंगल देशपांडे यांची मोलाची साथ लाभली होती. १९९० चे दशक हे या हॉस्पिटलसाठी सुवर्णकाळ ठरला. मात्र पुढे काळाच्या ओघात हे हॉस्पिटल मागे पडले. आता आम्ही काही डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांनी मिळून वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली असून, या अंतर्गत हॉस्पिटल पुन्हा एकदा आधुनिक रूपात सुरू करत आहोत.
या टीममध्ये डॉ. निनाद माढेकर, डॉ. स्नेहल माढेकर, डॉ. मयुरी पाटील, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. गौरी गायकवाड आणि श्री अमित इंगोले यांचा समावेश असून, इतरही अनेक डॉक्टर्स आणि मित्रमंडळींनी आम्हाला खूप मोठा पाठिंबा दिला आहे.या नव्या स्वरूपातील हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. भालचंद्र कश्यपी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माननिय आमदार दिलीपरावजी सोपल हे असणार आहेत. यावेळी श्री जयवंत बोधले महाराज आणि श्री राजा माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नव्या अद्ययावत सेवांमध्ये प्रशस्त ICU, CCU, इमर्जन्सी डिपार्टमेंट, आधुनिक ऑपरेशन थिएटर, स्पेशल रूम्स, जनरल वॉर्ड, सूट, भव्य वेटिंग हॉल, डॉर्मेट्री, कॅफेटेरिया, गार्डन एरिया, सर्व स्पेशालिटीसाठी स्वतंत्र ओपीडी, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, तसेच नव्याने सुसज्ज लेबर रूम आणि नवजात शिशु कक्ष (NICU) यांचा समावेश आहे. अशा सर्व सुखसोयींनी सुसज्ज हॉस्पिटल १५ जूनपासून बार्शीकरांच्या सेवेत पुन्हा एकदा दाखल होत आहे. तरी आपण सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वर्तमान हेल्थकेअर प्रा. लि.च्या (व्हीएचपीएल) संचालकांनी केले आहे.