Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

१० हजारांच्या मुदत ठेवींच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 28, 2025
in महाराष्ट्र
0
१० हजारांच्या मुदत ठेवींच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच
0
SHARES
18
VIEWS

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प

‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ उत्साहात संपन्न

पुणे : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ रविवारी पुण्यातील JW Marriott हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी मंत्री जयकुमार  गोरे, आयुषमान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय तथा विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजीटल मीडिया संघाचे राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिबिंब प्रतिष्ठान संस्थेच्या ध्येयधोरणांची माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या विशेष समारंभात राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.

चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले,“डिजिटल माध्यमांनी माहितीचा प्रसार वेगवान व व्यापक केला आहे. मात्र, पत्रकारांच्या मागे उभं असलेलं कुटुंब त्याग करतं, हे विसरता कामा नये. अशा पार्श्वभूमीवर ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ सारखी संस्था ही काळाची गरज आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे ”, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठान मार्फत राज्यातील १२००० पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. ज्यामध्ये प्रत्येकाला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, आजचा पत्रकार केवळ माहिती पुरवणारा नाही, तर समाजमन घडवणारा प्रभावी घटक आहे. ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ ही संस्था पत्रकारांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करते, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.”

जयकुमार गोरे यांनी सांगितले,“पत्रकार समाज हा समाजाचे आरसे असतो. त्यांचे योगदान मोठे असूनही त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ ही संस्था या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पत्रकारांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास, मूल्यसंस्कार आणि स्पर्धात्मक क्षमतांचा विकास घडवण्यासाठी ही संस्था मोलाची भूमिका बजावेल.”

संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक राजा माने यांनी सांगितले,“पत्रकारिता ही केवळ माहिती पुरवण्याचे माध्यम नाही, ती समाजाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच संस्थेला ‘प्रतिबिंब’ हे नाव दिले आहे. पत्रकारांच्या मुलांसाठी एक सशक्त, सकारात्मक व्यासपीठ निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पत्रकार कुटुंबांसाठी हे एक विश्वासार्ह आधार केंद्र ठरेल, याची आम्हाला खात्री असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार कुटुंबांसाठी ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. पत्रकारांचे जीवन धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने त्यांच्या कुटुंबाकडे, विशेषतः मुलांकडे, वेळ देणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर ही संस्था शिक्षण, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, मूल्यसंस्कार, कला-क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त उपक्रम राबवणार आहे.

पुरस्कार विजेते – महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारार्थी:

  • डॉ. किरण सावे, पालघर – आदिवासी शिक्षण
  • बिग हिट मीडिया – अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी
  • सचिन वायकुळे, बार्शी – तृतीयपंथीय आणि देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी कार्य
  • डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कंधार – शिक्षण व ग्रामविकास
  • उमाकांत मिटकर, नळदुर्ग – भटक्या-विमुक्त विकास
  • मोहन डांगरे, सोलापूर – महिला सक्षमीकरण
  • प्रशांत मोरे, महाबळेश्वर – युवा उद्योजक
  • संजय कोठारी, जामखेड – सामाजिक कार्य
  • नामदेवराव खराडे – साखर उद्योग
  • स्वप्निल परदेशी – चिक्की उद्योग
  • विजय राऊत – शिक्षण, क्रीडा, साहित्य
  • संदीप शिंदे – बेघर मनोरुग्ण पुनर्वसन
  • शिवराम घोडके – प्रगत शेती
  • आतिश शिरसाट – बेवारस मनोरुग्ण पुनर्वसन
  • भास्कर घुले – श्री विघ्नहर साखर कारखाना
  • संतोष ठोंबरे – ग्रामविकास
  • मानसिंगराव चव्हाण – सहकारी साखर उद्योग
  • शुभम पसारकर – दिव्यवंदना आधार फाउंडेशन

पत्रकारिता पुरस्कार:

  • सरिता कौशिक – एबीपी माझा
  • साहिल जोशी – मुंबई तक
  • संजीव उन्हाळे – ज्येष्ठ पत्रकार
  • भारत चव्हाण – लोकमत
  • दिलीप सपाटे – मंत्रालय वार्ताहर संघ

डिजिटल स्टार पुरस्कार:

  • नितीन पाटील – पोलीसनामा
  • अश्विनी जाधव – लोकमत डिजिटल
  • अभिजीत दराडे – मटा डिजिटल
  • विष्णू सानप – लेटसअप
  • ओमकार वाबळे – मुंबई तक

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या संयोजन समितीतील सदस्य,पदाधिकारी सतीश सावंत, महेश कुगांवकर, नंदकुमार सुतार, केतन महामुनी, शामल खैरनार, राजू वाघमारे, विकास भोसले, तेजस राऊत, इक्बाल शेख, दिपक नलावडे, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, गणेश हुबे, प्रशांत साळुंके यांची देखील उपस्थिती होती.

राज्यातील १२,००० डिजिटल पत्रकारांना मिळणार २ लाख रुपयांचे विमा संरक्षण; मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा

पुणे | प्रतिबिंब प्रतिष्ठान आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण समारंभात एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील १२,००० डिजिटल पत्रकारांसाठी २ लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षण योजनेची घोषणा केली.

पत्रकारांच्या अनिश्चित आणि अल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ही विमा योजना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, डिजिटल पत्रकारांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून संवेदनशील पावले उचलली जातील. मध्य प्रदेशने ज्या सवलती दिल्या आहेत त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन महाराष्ट्रात योजना राबवली जाईल.

ही विमा योजना प्रत्येक पत्रकाराच्या १०,००० रुपयांच्या एफडीच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. त्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी ४० रुपये अपघाती विमा आणि ५२० रुपये आरोग्य विमा प्रीमियम भरण्यात येणार आहे. अपघाती मृत्यू अथवा अंगविकृती झाल्यास संबंधित पत्रकाराच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, “पत्रकारांचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यांचे पाल्य शिक्षण कसे घेतील, आई-वडिलांचा औषध खर्च कसा भागवतील, यासाठी सरकारने त्यांच्या पैशांची बचत करणे म्हणजेच कमाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा योजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.

ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रस्ट व देणगीदारांची मदत घेण्यात येणार असून, ही योजना केवळ घोषणा राहणार नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले.

या घोषणेसह पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार समारंभ पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, संपादक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भारत-बांगलादेश सीमेवर वाढला तणाव

Next Post

हगवणे प्रकरणी कोर्टाने पोलिसांना फटकारले

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
हगवणे प्रकरणी कोर्टाने पोलिसांना फटकारले

हगवणे प्रकरणी कोर्टाने पोलिसांना फटकारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.