Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 17, 2025
in आंतरराष्ट्रीय
0
इराण-इस्रायल युद्धाच्या पाकला तीव्र झळा
0
SHARES
0
VIEWS


जी-७ परिषद सोडून ट्रम्प अमेरिकेत, अमेरिकन नागरिकांना तेहरान सोडण्याचे आदेश
इराणचा आणखी एक कमांडर ठार
जेरुसलेम : वृत्तसंस्था
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष चिघळला असून, दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू आहेत. इस्रायलने इराणमधील तेहरान शहराला लक्ष्य करीत महत्त्वाच्या भागांवर हल्ले केले. यात इराणचे कमांडर ठार झाले. इराणनेदेखील इस्रायलला जशास तसे उत्तर देत तेल अविवसह उत्तर इस्रायलमध्ये हल्ला चढविला. हा संघर्ष पेटलेला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी-७ परिषद सोडून अमेरिकेत दाखल झाले आणि अमेरिकन नागरिकांना तेहरान सोडण्यास सांगितले. दुसरीकडे चीनने इराणच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्या मागे बळ उभा करण्याचे संकेत दिले. त्यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता आहे.
इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात दोन्ही देशांचे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. इस्रायलने इराणमधील अणूउर्जा केंद्रांच्या ठिकाणावर हल्ले केल्यानंतर या युद्धाला आणखी भीषण रुप आले. इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादची ड्रोन बनविण्याची कंपनी उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. मंगळवारी सकाळीच इराणने इस्रायलवर बरेच क्षेपणास्त्र डागले. दुसरीकडे इस्रायली हल्ल्यात इराणचे चीफ ऑफ स्टाफ अली शादमानी ठार झाले. त्यामुळे इराणला काही दिवसांत दुसरा कमांडर गमवावा लागला. या अगोदर गुलाम अली रशीद हे कमांडर मारले गेले होते. त्यांच्या जागी शादमानी यांची नेमणूक केली. परंतु तेही ठार झाल्याने इराणला मोठा धक्का बसला.
दुसरीकडे इराणवर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इराणी नागरिकांना तेहरान सोडण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे ९.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या तेहरानमधून लाखो नागरिक राजधानीबाहेर पडले आहेत. आता अमेरिकेनेही आपल्या नागरिकांना तेहरान सोडण्याचे आदेश दिले. तसेच आता आमचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. आम्हाला या संघर्षात शस्त्रसंधीपेक्षा अधिक चांगला शेवट हवा आहे. तात्पुरती शस्त्रसंधी नको, असे म्हणत ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या हल्ल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तेहरानमधून नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.
त्यातच अमेरिकेने युद्धनौकाही पाठविली आहे. त्यामुळे अमेरिका इस्रायलला साथ देत मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे चीननेही यात एन्ट्री केल्याने युद्धाची व्यापकता वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते अमानुल्ला अली खामेनी यांना संपविल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यात इराणने हल्ले वाढविले आहेत. त्यामुळे चांगलाच संघर्ष पेटल्याचे चित्र आहे.

Previous Post

कृषी क्षेत्रात आता एआय वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.