Wednesday, June 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 18, 2025
in महाराष्ट्र
0
स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
4
VIEWS

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश… त्यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला बळ मिळेल – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे लोकप्रिय काँग्रेस नेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार संजय केनेकर, भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आणि भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जयश्रीताईंचे भाजपात स्वागत करतो. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला बळ मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यात माजी महापौर किशोर शहा, कांचनताई कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजळेकर, विरोधी पक्षनेता उत्तम साखळकर, माजी स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, माजी सभापती शेवंताताई वाघमारे, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, प्रकाश मुळके, अजित दोरकर, तानाजी पाटील, सुभाष यादव, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

जयश्री पाटील या दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी असून, त्या काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि एक प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती पाटील या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

Previous Post

अरण्यॠषी, पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
  • अरण्यॠषी, पक्षिमित्र मारुती चितमपल्ली यांचे निधन
  • सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा : महाजन
  • राज्यात सुमारे ११.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या
  • आणीबाणीत कारावास,मानधन मिळणार दुप्पट

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.