मँचेस्टर : वृत्तसंस्था
जो रूटची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते आणि त्याने एकट्याने इंग्लंड संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. भारताविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीतही त्याने दमदार दीडशतक ठोकले आणि आपला दम दाखवून दिला. चौथ्या कसोटी सामन्यात त्याने दीड शतक ठोकले. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत जो रूटने आता दिग्गज जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले आहे.
कसोटीमध्ये रूटने १०४ वे अर्धशतक झळकावले आहे. त्याच वेळी कॅलिस आणि द्रविड दोघांनीही कसोटीत १०३-१०३ अर्धशतक ठोकली. आता फक्त सचिन तेंडुलकर रूटच्या पुढे आहे. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये ११९ अर्धशतक झळकावले आहेत. तर जो रूटने १०४ अर्धशतक झळकावले आहेत. जो रूट महान फलंदाज तेंडुलकरपेक्षा फक्त १५ अर्धशतकांनी मागे आहे, ज्या फॉर्ममध्ये रूट आहे. त्यामुळे तो तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो.