मुंबई : प्रतिनिधी
चित्रकार शशिकांत धोत्रेचा सजना मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडविण्याच्या दिशेने कूच करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या चित्रपटाचे रिलीज झालेले आनंद शिंदे यांच्या आवाजातील फाईट बुंगा..हे गाणं राज्यातील प्रत्येक उत्सवात वाजणार अन् गाजणार.. उभा महाराष्ट्र फाईट बुंगा गाण्यावर ठेका धरणार. यात कुठलीही शंका नाही. कारण गाणे रिलीज झाल्या, झाल्या पसंतीचा अक्षरश: पाऊस पडला. त्यामुळे आगामी काळात आपल्याला फाईट बुंगाची क्रेज पाहायला मिळणार आहे.