Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 17, 2025
in आंतरराष्ट्रीय
0
मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी
0
SHARES
3
VIEWS


तेहरान : वृत्तसंस्था
इस्रायल-इराण युद्धाने भीषण रुप धारण केले आहे. इराणी नागरिकांनी तेहरान सोडण्यास सुरुवात केली आहे. तेहरानच्या रस्त्यावर शहराबाहेर निघणाऱ्या वाहनांचे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. इस्रायलने आधीच तेहरान रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. कुठल्यातरी भयानक हल्ल्याची ही चाहूल आहे.

इराणच्या मिसाइल हल्ल्यात इस्रायलमधील तेल अवीव, हायफा या शहरांचे मोठ नुकसान झाले. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे तेहरानवरील संभाव्य भीषण हल्ला हे त्याचेच प्रत्युत्तर असेल. सध्या दोन्ही देशांचे सैन्य परस्परांचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचूक हल्ले करुन जास्तीत जास्त यश मिळवण्यात इंटेलिजेंसची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने इराणचे प्रचंड नुकसान केले आहे. इराणच्या गुप्तचर संस्थेचे नाव वाजा असून त्यांनी पलटवार सुरु केला आहे.

दोन्ही देशांचे गुप्तचर सिक्रेट मिशन्सवर आहेत. तेहरानमध्ये मोसादच्या काही एजटन्सना पकडण्यात आले. एकाबाजूला मिसाइल स्फोटाचे आवाज, ड्रोन हल्ले दुसऱ्या बाजूला कोणाला काही कळू न देता घातक मिशन्स प्रत्यक्षात आणणारी फौज. आतापर्यंत पाच दिवसांच्या युद्धात मोसादने इराणला हादरवून सोडले. अचूक इंटेलिजेंसच्या बळावर इराणचे अण्वसस्त्र प्रकल्प, सैन्य ठिकाणे यावर हल्ले केलेच. पण इराणचे अण्वस्त्र शास्त्रज्ञ, बडे लष्करी अधिकारी यांना सुद्धा संपवले. इराणवर हा सर्वात मोठा आघात होता.

पहिल्या हल्ल्यात इराणच सैन्य नेतृत्वहीन
जग पुन्हा एकदा मोसादच्या या कामगिरीने थक्क झाले. इस्रायलने इराणवर जितके बॉम्ब हल्ले केले ते अत्यंत अचूक होते. इस्रायलचा प्रत्येक हल्ला इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर होता. इराणी कमांडर्स कुठे आहेत? त्याची माहिती मोसादकडे आधीपासूनच होती. मोसादने आधीच आपल्या एअरफोर्सला सांगितलेले, अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित वैज्ञानिक कुठे आहेत. म्हणूनच इस्रायलच्या पहिल्या हल्ल्यात इराणच सैन्य नेतृत्वहीन झाले.

इराणच्या गुप्तचर यंत्रणा केली उद्ध्वस्त
मोसाद आता पेजर अटॅकप्रमाणे इराणमध्ये कार बॉम्बस्फोट घडवून आणत आहे. मोसादने इराणच्या पाणी पुरवठा सिस्टिमवर हल्ला केला. मोसादचे एजंट्स आता इराणची गुप्तचर यंत्रणा वाजाच्या एजंट्सची हत्या करत आहेत. त्यांनी इराणी गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयावर हल्ला केला. इराणी इंटेलिजेंसचे चीफ आणि डेप्युटी चीफची हत्या झाली. इराणचे टॉप ४ इंटेलिजेंस ऑफिसर मारले गेले आहेत.

पाण्याच्या पाईपलाईन फोडल्या,
तेहरानमध्ये पूरसदृश स्थिती

इराणकडून मोसादच्या एजंट्सना पकडण्यासाठी अभियान सुरु आहे. पण त्याचवेळी मोसादच्या एजंट्सनी इराणला हादरवून सोडले. रिपोर्टनुसार कारमध्ये बॉम्ब प्लान्ट केले जात आहेत. एका दिवसात इराणमध्ये पाचपेक्षा जास्त बॉम्बस्फोट झाले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये रस्त्यावर पूर सदृश स्थिती पाहून सगळेच हैराण झाले. पाण्याच्या पाइपलाइनमध्ये स्फोट झाले. त्यामुळे तेहरानच्या रस्त्यावर पुरासारखी स्थिती आहे.

Previous Post

एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

Next Post

इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Related Posts

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर
आंतरराष्ट्रीय

भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर

July 24, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट
आंतरराष्ट्रीय

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025
Next Post
इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.