२३ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम, विधान परिषद सभापती राम शिंदे, राजा माने यांची उपस्थिती
अहिल्यानगर : प्रतिनिधी
एन. टी. व्ही.च्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथील हॉटेल व्ही. स्टार (तारकपूर बसस्टँडनजीक) येथे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी गणेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुभाष काकडे, सातारा डीडी न्यूजचे रिपोर्टर विकास भोसले, दै. मानदेशीनगरी, सोलापूरचे संपादक सतीश सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एन. टी. व्ही. न्यूज मराठीचे संपादक इकबाल शेख यांनी केले आहे.