Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

अमेरिकेत उद्रेक

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 7, 2025
in राजकीय
0
अमेरिकेत उद्रेक
0
SHARES
3
VIEWS


ट्रम्प अ‍ॅण्ड मस्क गो बॅकचा नारा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत येऊन ३ महिने होत नाही, तोच त्यांच्याविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराविरोधात अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले आहे. ट्रम्प यांच्यासह अब्जाधीश एलन मस्क यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले असून, लाखो नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील रस्त्यांवर आंदोलकांचा महापूर पाहायला मिळाला. ट्रम्प अँड मस्क मस्ट गो, असा नारा देत आंदोलकांनी रान उठविले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि एलन मस्कचा सरकारमध्ये वाढता प्रभाव यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र रोष आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, नवीन टॅरिफ धोरण म्हणजेच वाढलेले आयात शुल्क आणि अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय याचा अमेरिकेतील जनतेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली असून, अमेरिकेच्या सर्वच म्हणजे ५० राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात नागरिकांनी रणशिंग फुंकले. या आंदोलनाला हँड्स ऑफ असे नाव देण्यात आले असून, या मोहिमेतून देशभरात तब्बल १४०० ठिकाणी निदर्शने केली गेली. बोस्टन, न्यूयॉर्क, शिकागो, पोर्टलँड, सॅन दिएगो, सॅन फ्रान्सिस्कोमध्येही प्रचंड निदर्शने झाले.

सरकारी नोक-यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार, टॅरिफ धोरण या गोष्टींविरोधात अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणा-या कर्मचा-यांमध्ये मोठी कपात करण्यात आली. विशेष म्हणजे या निर्णयामुळे गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य, मानवी सेवा अशा विविध विभागातील कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. त्यामुळे संतापलेले अमेरिकेचे नागरिक हे रस्त्यावर उतरले आहेत.

या आंदोलनात जवळपास ६ लाख नागरिकांनी सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. काही निदर्शने ही लंडन आणि पॅरिससारख्या शहरांत झाली. भारताविरोधात भूमिका मांडणा-या इल्हान उमर यांनीदेखील या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली तर डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार जेमी रास्किन यांनी तर ट्रम्प यांच्या सत्तेला हुकूमशाही म्हटले.

दीडशेपेक्षा जास्त संघटना आंदोलनात
नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकील संघटना यांच्यासह तब्बल १५० पेक्षा जास्त संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अमेरिकेच्या सत्तेवर अब्जाधिशांनी कब्जा केला आहे. त्यामुळे त्याविरोधात आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

ट्रम्प, मस्कविरोधात नागरिक एकवटले
आंदोलकांच्या हातात हँड्स ऑफ असे लिहिलेले पोस्टर आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, त्याचा नागरिकांनी निषेध नोंदवला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आंदोलकांनी चिंता व्यक्त केली. ट्रम्प जगाला जागतिक मंदीच्या दिशेला ढकलत आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे असून, मस्क अँड ट्रम्प मस्ट गो या घोषणांनी अमेरिकेचे रस्ते दुमदुमले आहेत.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
अमेरिकेतील आंदोलकांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. अमेरिकेत अब्जाधिशांनी सत्तेवर कब्जा केला, त्याला हटवावे आणि त्यांचा भ्रष्टाचार रोखावा. दुसरी मागणी मेडिकेड आणि सोशल सिक्युरिटीसारख्या अत्यावश्यक कार्यक्रमांसाठी फेडरल फंडातील कपात थांबवावी आणि ट्रान्सजेंडर आणि इतर समुदायावर होणारे हल्ले थांबवावेत अशा आंदोलकांनी ३ मागण्या केल्या.

ट्रम्प भूमिकेवर ठाम
ट्रम्प यांच्या निर्णयांचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. २०२० च्या लॉकडाऊन काळात अमेरिकेच्या शेअर बाजाराने जी घसरण पाहिली, तीच स्थिती अमेरिकेत होण्याची शक्यता आहे. अशाही स्थितीत, मी माझी धोरणे कधीही बदलणार नाही, असे म्हणत श्रीमंत होण्याची हीच उत्तम वेळ असल्याची पोस्ट ट्रम्प यांनी केली.

Previous Post

लातूर मनपा आयुक्ताचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

जागतिक शेअर बाजारात हाहाकार

Related Posts

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंचा मेळावा, वरळी डोममध्ये तुफान गर्दी

July 6, 2025
पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र !
राजकीय

पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र !

April 28, 2025
पाकिस्तान कंगाल, आता होणार बेहाल!
राजकीय

पाकिस्तान कंगाल, आता होणार बेहाल!

April 25, 2025
माजी आमदार थोपटे भाजपात दाखल
महाराष्ट्र

माजी आमदार थोपटे भाजपात दाखल

April 22, 2025
संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?
महाराष्ट्र

संभाजी भिडेंना वाघ्या कुत्रा तर चावला नाही ना?

April 16, 2025
फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार
राजकीय

फ्रान्ससोबत राफेल मरीन फायटर जेट खरेदी करार

April 10, 2025
Next Post
जागतिक शेअर बाजारात हाहाकार

जागतिक शेअर बाजारात हाहाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.