पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्वप्रथम पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला. आतापर्यंत कूटनितीक भूमिका घेतली. एकीकडे भारताने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानवर दबाव वाढविण्याचे काम केले. अजून लष्करी कारवाई झालेली नाही. परंतु अगोदरच पाकिस्तानने भारताच्या कारवाईची धास्ती घेतली आहे. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावरुन पाकिस्तान बिथरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, त्यांचे मंत्री, सैन्य प्रमुख आसिम मुनीर, त्यांचे कर्नल, जनरल आणि टेररिस्तानमध्ये फक्त अणुबॉम्ब, अणुबॉम्बचा जप ऐकू येत आहे. तिथे कट्टरपंथी मौलानासुद्धा अणूबॉम्बची धमकी देत आहेत. भारताचा पुढचा प्रहार कसा असेल? याच चिंतेमध्ये सध्या पाकिस्तान आहे. त्यामुळे त्यांच्या हातात आता फक्त अणुबॉम्ब बोलण्याशिवाय काहीही उरलेले नाही. भीती, हताशपणा आणि गोंधळलेली मानसिकता यातून पाकिस्तानी सैन्याने सीजफायर मोडून आपल्याच हाताने आपल्या पायावर कुºहाड मारून घेतली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि अतिरेक्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत आता दहशतवाद मातीत गाडून टाकण्याची वेळ आलेली आहे. आता आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यातच पुन्हा ‘मन की बात’ कार्यक्रमात पहलगाम हल्ल्याबद्दल बोलले. मी पीडित कुटुंबाना विश्वास देतो, त्यांना न्याय मिळणार. या हल्ल्याचे दोषी आणि कारस्थान रचणाºयांना कठोरातील कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अतिरेकी कारवायांचे कटकारस्थान रचणाºया पाकिस्तानला हा इशारा मानला जात आहे. मोदींच्या इशाºयाने टेररिस्तानच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. इस्लामाबादमधून थेट या भयाच प्रसारण सुरु झाले. उद्या युद्ध झाल्यास पाकिस्तान किती दिवस टिकू शकतो? हा पाकिस्तानात चर्चेचा सर्वात मोठा मुद्दा आहे.
छोट्या युद्धात पाकिस्तान तरून जाईल. त्यांची एअरफोर्स, आर्मी थोडे दिवस टिकाव धरतील. पण लॉन्ग वॉरमध्ये पाकिस्तान टिकू शकत नाही. कारण पाकिस्तानकडे शस्त्रांचे तितके स्त्रोत, पैसा नाही, असे तेथील एक्सपर्टच म्हणणे आहे. तीन महिने युद्ध झाल्यास पाकिस्तान टिकू शकणार नाही. भारताविरुद्ध कुठल्याही युद्धात आपण टिकू शकत नाही, हे त्यांना माहित असल्यामुळेच पाकिस्तानने अणुबॉम्ब बनवला.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे सिद्ध झाले आहे. आसिम मुनीरपासून शहबाज शरीफपर्यंत सर्वांना चांगले ठाऊक आहे की, भारत यावेळी सोडणार नाही. यावेळी प्रहार दहशतवादी तळांवर नाही, त्याच्या मूळावर होणार. पाकिस्तानकडे स्वत:ला वाचवण्याचा काही मार्ग नाही. त्यामुळे आसिम मुनीरची भित्री सेना आणि शहबाज सरकारमधील घाबरलेले मंत्री सारखे-सारखे अणुबॉम्ब, अणुबॉम्बचा जप करत आहेत.
आता पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनीही नव्याने धमकी दिली असून, जर आमचे पाणी बंद केले, तर युद्धासाठी तयार व्हा. गौरी, शाहीन, गजनवी क्षेपणास्त्र आम्ही चौकात सजवण्यासाठी ठेवलेले नाहीत. आम्ही ही अस्त्र हिंदुस्तानविरुद्ध वापरण्यासाठी बनवली आहेत. आमच्याकडे १३० अणुबॉम्ब आहेत. ते आम्ही फक्त मॉडल बनवण्यासाठी ठेवलेले नाहीत. पाकिस्तानच्या कुठल्या, कुठल्या भागात आम्ही हे बॉम्ब ठेवले, हेसुद्धा तुम्हाला माहित नाही, असे म्हटले. पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देण्यासाठी हनीफ अब्बासी हे बोलत असतील तर ठिक आहे. पण युद्ध तुमच्याकडे कुठली शस्त्र आहेत, ते पाहून लढले जात नाही. तुमचा उद्देश, दृष्टीकोन आणि साहस त्यासाठी लागते. २०१६ आणि २०१९ मध्येही पाकिस्तानकडे अणूबॉम्ब होते. पण त्यावेळी सुद्धा सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक केला.
खरे तर तुमच्याकडे शक्ती असेल, तर आत्मविश्वास वाढतो. पण पाकिस्तानी नेते ज्या प्रकारे अणुबॉम्बचा प्रचार करत आहेत, त्यातून त्यांची भीती दिसून येते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सतत स्टेटमेंट सुरु आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक वक्तव्यातून भीती स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमच्या सर्व सुरक्षा यंत्रणा आणि सैन्य सर्व हाय-अलर्टवर आहे. इथे चूक होण्याची शक्यता नाही. आम्ही आमच्या सुरक्षेची व्यवस्था करत आहोत.
युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत
दहशतवादाचे मूळ संपवण्याची पीएम मोदींनी शपथ घेतली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची भूमिका पाहून पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल मुनीर ते संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या घशाला कोरड पडली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत देत आहेत. पाकिस्तानचे गृह मंत्री मोहसिन नकवी यांनी आम्ही १०० टक्के तयार आहोत. त्यांच्यापेक्षा आम्ही युद्धासाठी जास्त तयार आहोत. आम्ही युद्धखोर आहोत. त्यांनी कुठले पाऊल उचलले तर एकचे दोन आणि दोनचे चार होणार. आमचे पीएम आणि आर्मी चीफ बोलले आहेत, अशी युद्धाची भाषा वापरली.
मुळात पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या आक्रमणाची चांगलीच धास्ती घेतली आहे. एकाबाजूला मुनीरच्या सैन्याचे जनरल आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवत आहेत. दुसºया बाजूला सारखी अणूबॉम्बची धमकी देत आहेत. आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही आमच्यावर हल्ला करु शकत नाही. तुम्ही तुमची रेड लाइन क्रॉस केली, जसे की सिंधु कराराच पाणी बंद केले किंवा दिशा वळवण्याचा प्रयत्न केला तर ऐलान-ए-जंग होणार. ऐलान-ए-जंग झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीनिशी हल्ला करु. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. गरज पडल्यास आम्ही सुरुवातच न्यूक्लियर शस्त्रपासून करु. तुमचे अस्तित्व मिटवू, पाकिस्तानचे रिटायर्ड जनरल तारिक रशीद यांनी ही धमकी दिली. त्यामुळे पाकिस्तान किती धास्तावला आहे, याचा अंदाज येतो.